शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी सुरू होऊनही साखर गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:32 IST

दरवर्षी सणासुदीला शासनाकडून गोरगरिबांना गोडधोड करून खाण्यासाठी माणशी दिली जाणारी रेशनवरील अतिरिक्त साखर बंद करून केंद्र व राज्य सरकारने तोंड कडू केलेले असताना, आता वाहतूक ठेकेदाराने चालू महिन्याची साखर रेशन दुकानांपर्यंत न पोहोचविल्याने ऐन दिवाळीत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना खुल्या बाजारातून चढ्या भावात साखर खरेदी करावी लागत आहे.

नाशिक : दरवर्षी सणासुदीला शासनाकडून गोरगरिबांना गोडधोड करून खाण्यासाठी माणशी दिली जाणारी रेशनवरील अतिरिक्त साखर बंद करून केंद्र व राज्य सरकारने तोंड कडू केलेले असताना, आता वाहतूक ठेकेदाराने चालू महिन्याची साखर रेशन दुकानांपर्यंत न पोहोचविल्याने ऐन दिवाळीत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना खुल्या बाजारातून चढ्या भावात साखर खरेदी करावी लागत आहे.  सणासुदीतच साखर मिळणार नसेल तर नंतर उपयोग काय, असा सवाल करून रेशनच्या साखरेचा काळाबाजार होण्याची शंकाही या निमित्ताने व्यक्त केली जात  आहे.  सरकारने रेशनवरील धान्यव साखरेची थेट दुकानापर्यंत वाहतूक करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केली असून, ठेकेदाराने जर साखर पुरविलीच नाही तर दुकानदार कोठून विकणार, असा सवाल दुकानदारांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.  केंद्र सरकारने दारिद्र्य-रेषेखालील व अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना दरमहा रेशनवरून स्वस्त दरात साखर देण्यासाठी दिले जाणारे अनुदान राज्य सरकारला देणे बंद केल्यामुळे राज्य सरकारने सध्या फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थींनाच प्रतिकार्ड एक किलो साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारने आॅगस्ट महिन्यातच सप्टेंबर ते नोव्हेंबर अशा तीन महिन्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील लाभार्थींसाठी लागणाºया साखरेचा कोटा मंजूर केला आहे.  नाशिक जिल्ह्यात अंत्योदय योजनेच्या एक लाख ७९ हजार ४०८ शिधापत्रिका असून, त्यासाठी शासनाने ५३९२ मेट्रिक टन साखर मंजूर करून जिल्ह्याच्या ताब्यात दिली. सदरची साखर त्या-त्या तालुक्यातील शिधापत्रिकेच्या संख्येच्या प्रमाणात तालुक्यांच्या शासकीय गुदामात रवाना झाल्याचे जिल्हा पुरवठा कार्यालयाचे म्हणणे आहे.