शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सुळे डाव्या कालव्यावरील मोऱ्यांचे काम निकृष्ट

By admin | Updated: December 23, 2014 00:16 IST

नियमांचे उल्लंघन : कामाची चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी

पिळकोस : कडवा धरण उपविभाग अंतर्गत सुळे डाव्या कालव्यावर चाचेर पिळकोस शिवारात सुरू असलेले मोऱ्यांचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, याची संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी व कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. पांढरीपाडा रस्त्याच्या जवळ, आसोले डोंगराच्या पायथ्याला मोऱ्या टाकण्याचे काम सुरू असून, टी . एन. टी. कन्स्ट्रक्शन, नाशिक यांना हे काम दिलेले आहे. सदर बांधकामात मोठ्या प्रमाणावर दगड-माती मुरूम गोट्यांचा वापर करण्यात येत असून, कामात सीमेंटचाही अभाव दिसून येत आहे. या प्रकरणी शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली असून, संबंधित विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. कडवा धरण उपविभागाअंतर्गत सुळे डाव्या कालव्याचे ३७ कि.मी. पर्यंत काम झाले असून, खामखेडा गावाच्या पुढील काम प्रलंबित आहे. चाचेर गावाच्या पांढरीपाडा रस्त्याच्या पूर्वेला शिवारातील डोंगराचे पाणी वाहत येऊन कालव्यात टाकण्यासाठी मोऱ्या टाकण्यात येत आहे. हे काम करत असताना, संबंधित ठेकेदाराकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे.कडवा धरण उपविभागाच्या अभियंत्यांचे सदर कामावर नियंत्रण असताना, संबंधित विभागाच्या एकाही अधिकाऱ्याकडून या कामावर नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे ठेकेदाराकडून दगड-गोट्यांचा वापर करुन निकृष्ठ काम केले जात आहे. काम सुरू असताना येथे संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असताना, अधिकारी तर सोडा, पण कर्मचारीदेखील फिरकला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत आमदार जे. पी. गावित यांच्याकडे व जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्र ार करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सुळे डाव्या कालव्यास गळती लागून शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, कालव्यास दीडशे फूट कॉँक्रिटीकरण प्रस्तावित असून, हे कामही सदर ठेकेदारास दिले आहे. सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात येऊन चांगले काम करणाऱ्या ठेकेदारांनाच कामे दिली जावीत व सदर काम करणाऱ्या ठेकेदाराचे बिल अदा केले जाऊ नये, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. (वार्ताहर)