शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ब्यूटि पार्लरच्या सेवेलाही फटका

By admin | Updated: July 10, 2017 00:37 IST

नाशिक : केंद्र सरकारने एक करप्रणाली लागू केल्यामुळे काही वस्तू व सेवा स्वस्त होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र सरकारने एक करप्रणाली लागू केल्यामुळे काही वस्तू व सेवा स्वस्त होणार आहेत, तर काही महाग होणार आहेत. यात महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ब्यूटि पार्लरला महागाईचा फटका बसणार आहे. सौंदर्य प्रसाधने, सौंदर्य सेवा यांच्यावर २८ टक्के जीएसटी लागू झाला असल्याने या वस्तू आणि सेवा महागणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. जीएसटीमुळे दरवाढीचे संकेत असले तरी अद्याप जुना स्टॉक क्लिअरन्स करण्याचे काम चालले असून, मुख्य कंपन्यांकडून नवीन दर, नवीन बिलिंग पद्धत याबाबत कोणतीही स्पष्ट सूचना न आल्याने जुने दर, जुनी पद्धत चालू ठेवायची की जीएसटीनुसार सेवा द्यायची, याबाबत संभ्रमावस्था असल्याचे दिसून आले. येत्या आठ ते पंधरा दिवसांत मूळ कंपन्या, ब्यूटि पार्लर संघटना काय निर्णय घेतात, त्यानुसार चित्र स्पष्ट होइल, असे दिसते.दरम्यान, १ जुलैपासून आॅर्डर दिलेली सौंदर्य प्रसाधने, साहित्य यांचा पुरवठाही अद्याप झालेला नसल्याने व्यावसायिक, विक्रेते आणि ग्राहक अशा साऱ्यांनाच त्याचा फटका बसत आहे. मोठ्या व ब्रॅँडेड कंपन्या सौंदर्य प्रसाधनांवर पूर्वी छोट्या-मोठ्या फ्री गिफ्ट्स वा अन्य सवलतीही देऊ करत होत्या. आता फ्री गिफ्टवरही जीएसटी बसणार असल्याने त्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वाटते. यामुळे सौंदर्य प्रसाधनांची खरेदी, लहान- मोठ्या पार्लरमध्ये जाऊन सौंदर्योपचार घेण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.