शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

सिडकोत फिरताहेत ब्रेक फेल घंटागाड्या

By admin | Updated: May 8, 2016 00:28 IST

मनपाचा अजब कारभार : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

 सिडको : महापालिकेच्या वतीने नागरिकांचा दैनंदिन कचरा गोळा करण्यासाठी घरापर्यंत घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु गेल्या काही महिन्यांपासून सिडको भागात फिरणाऱ्या घंटागाड्यांची दयनीय अवस्था झाली असून, यातील काही घंटागाड्यांचे तर ब्रेक फेल झालेले आहेत. स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक अशी संकल्पना मनपाकडून मांडण्यात येत असली तरी मनपाच्या सिडको भागातील आरोग्य विभागाचे कामकाज अत्यंत ढिसाळ व नियोजनशून्य पद्धतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. सिडको भागात मुख्य रस्त्याबरोबरच ठिकठिकाणी कचरा साचलेला असतो. मनपा कर्मचारी हेदेखील वरवर कामकाज करीत असतानाही याकडे अधिकारी लक्ष देत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सिडको भागात अनियमित घंटागाड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही भागात घंटागाड्या फिरकतच नसून यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव रस्त्यालगत कचरा फेकून द्यावा लागत आहे.सिडको प्रभागात ११ प्रभागांसाठी २२ घंटागाड्या असल्या तरी यातील बहुतांशी घंटागाड्यांची दयनीय अवस्था झाली आहे. काही घंटागाड्यांचे ब्रेकच नादुरस्त आहेत. काही महिन्यांपूर्वी घंटागाडीच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू झाला असतानाही मनपाला जाग येत नसल्याने महिला व नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकदा घरांतील शाळकरी मुलेदेखील कचरा टाकण्यासाठी जात असून, बे्रक फेल घंटागाडीमुळे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)