शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

पुणे रेल्वेचा मार्ग अचानक बदलल्याने गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:21 IST

प्रवाशांचा संताप, तिकिटांच्या रकमेचा परतावा मागण्यासाठी गर्दी नाशिकरोड : भुसावळ-पुणे रेल्वेचा मार्ग अचानक बदलला आणि मनमाडहून ही रेल्वे नगर, दौंडमार्गे पाठविण्यात आल्यानंतर प्रवाशांना त्याची पूर्वकल्पनाही देण्यात आली नाही. त्यामुळे शेकडो प्रवासी ताटकळले. सदरची रेल्वे परस्पर गेल्याचे कळल्यानंतर मात्र तिकिटाच्या परताव्यासाठी गोंधळ उडाला. नियोजनशून्य कारभाराबद्दल प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

प्रवाशांचा संताप, तिकिटांच्या रकमेचा परतावा मागण्यासाठी गर्दीनाशिकरोड : भुसावळ-पुणे रेल्वेचा मार्ग अचानक बदलला आणि मनमाडहून ही रेल्वे नगर, दौंडमार्गे पाठविण्यात आल्यानंतर प्रवाशांना त्याची पूर्वकल्पनाही देण्यात आली नाही. त्यामुळे शेकडो प्रवासी ताटकळले. सदरची रेल्वे परस्पर गेल्याचे कळल्यानंतर मात्र तिकिटाच्या परताव्यासाठी गोंधळ उडाला. नियोजनशून्य कारभाराबद्दल प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.भुसावळहून नाशिकरोडमार्गे पुण्याला जाणारी रेल्वे पहाटे पाच वाजेच्या सुमारास येथे येत असते. त्यानुसार प्रवाशांनी तिकिटे काढली होती; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ही रेल्वे परस्पर मनमाडहून नगर, दौंडमार्गे पुण्याला पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात नाशिकरोड स्थानकावर कोणत्याही प्रकारची उदघोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे विलंबाने रेल्वे येईल या अपेक्षेवर असलेल्या रेल्वे प्रवाशांना स्थानकावर कोणतीच माहिती मिळत नव्हती. इतकेच काय सदरची रेल्वे रद्द झाली किंवा कसे याबाबतही माहिती देण्यात आली नाही. तथापि, ही रेल्वे मनमाडमार्गे पुण्याला पाठविण्यात आल्याचे कळताच प्रवाशांनी रेल्वेस्थानकावर गोंधळ घातला. अनेकांनी तिकिटांची रक्कम परत मागितली. परंतु ती न मिळाल्याने गोंधळ उडाला. काहींनी तक्रार वाहिनीवर संपर्क साधून तक्रार केली. त्यावेळी, परतावा मिळत नसेल तर पोलिसांत तक्रार दाखल करा, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्याचे काही प्रवाशांनी सांगितले, तर दुपारी १२ वाजेनंतर येथे आलेल्या प्रवाशांना तुम्ही सकाळी का परतावा मागितला नाही, असा प्रतिप्रश्न केला. दरम्यान, सायंकाळी पुण्याहून निघालेली रेल्वेही त्याच मार्गे भुसावळकडे पाठविण्यात आली. त्यामुळे सायंकाळीही गोंधळाचे वातावरण होते. गुरुवारी (दि. २) भुसावळ-पुणे रेल्वे नाशिकरोडमार्गेच जाणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.