शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:46 IST

श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची टीम द स्पार्टन्सने नाशिक पाठोपाठ पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या अ‍ॅटो रेसिंग चॅम्पियनशिप - ०४ या राष्ट्रीय स्पर्धेत पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची छाप उमठवत तीन पुरस्कार पटकाविले आहेत.

चांदवड : येथील श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची टीम द स्पार्टन्सने नाशिक पाठोपाठ पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या अ‍ॅटो रेसिंग चॅम्पियनशिप - ०४ या राष्ट्रीय स्पर्धेत पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची छाप उमठवत तीन पुरस्कार पटकाविले आहेत.राष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्पर्धेत देशभरातून ४० संघांनी सहभाग नोंदविला होता. अतिशय खडतर अशा चाचण्या पार करत गो-कार्ट कारने हा विजय मिळविला आहे. या स्पर्धेत टीम द स्पार्टन्स बनविलेल्या वॉर हॅमर २.०(गो-कार्ट कार) ने प्रवेग चाचणीत १०० मीटर अंतर ४.९० सेकंद या विद्युत वेगाने पार करीत (दहा हजार रु पये)रोख रक्कम व प्रथम पारितोषिक पटकाविले व त्याचबरोबर सीएइ चाचणीत सुद्धा (दहा हजार रु पये) रोख रक्कम व प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या कारच्या अप्रतिम डिझाईन व अस्थेटिकला रोख पाच हजार रु पये व द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रा. डी. डी. संचेती यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या टीम द स्पार्टन्समध्ये कॅप्टन चैतन्य ठाकूर व रायडर तुषार कुंभार्डे सह १६ विद्यार्थ्यांचा समावेश होता. या कारचे संपूर्ण डिझाईन महाविद्यालयाच्या वर्कशॉप मध्येच करण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा, झुंबरलाल भंडारी, सुनिलकुमार चोपडा, एम. डी. कोकाटे, एस. डी. संचेती यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला़

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र