शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासाला जिद्दीची जोड दिल्यास यश : बच्छाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:29 IST

गुणगौरव कार्यक्रम होणे महत्त्वाचे असून त्या माध्यमातून प्रेरणा मिळण्यासोबतच सामाजिक बांधिलकी निर्माण होते. पालकांनी विद्यार्थ्यांना करिअरची निवड करताना त्यांचा कल लक्षात घ्यावा, अभ्यास व जिद्द यांची जोड दिल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन जि. प. शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी केले.

नाशिक : गुणगौरव कार्यक्रम होणे महत्त्वाचे असून त्या माध्यमातून प्रेरणा मिळण्यासोबतच सामाजिक बांधिलकी निर्माण होते. पालकांनी विद्यार्थ्यांना करिअरची निवड करताना त्यांचा कल लक्षात घ्यावा, अभ्यास व जिद्द यांची जोड दिल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन जि. प. शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी केले.  कालिका मंदिर सभागृहात झालेल्या खान्देश मराठा मंडळाच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून बच्छाव बोलत होते. बच्छाव म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे त्यासाठी पालकांनीही आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप फाउंडेशनचे प्राचार्य प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी अध्यक्ष शंकर पाटील, निंबा पाटील, नवनियुक्त कार्यकारिणीचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील, उपाध्यक्ष सुधाकर शिसोदे, सचिव अविनाश पाटील, अशोक पाटील, बी. आर. पाटील, हेमंत शिरसाठ, शिवाजी शिसोदे, संदीप पाटील, मनोज आमले, रमेश पाटील, दीपक देसले आदी उपस्थित होते. यावेळी बच्छाव यांच्या हस्ते नवनियुक्त कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. मंडळाच्या माध्यमातून दोनशे विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्मृतिचिन्ह, गुलाबपुष्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे माजी विश्वस्त पी. टी. पाटील, दहावीत १०० टक्के गुण मिळविणाऱ्या रसिका शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास रवि पाटील, सुभाष चव्हाण, देवराम सैंदाणे, नारायण पाटील, यशवंत नेरकर, भाऊसाहेब पाटील, नितीन अहिरराव, नितीन पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, श्यामकांत पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक