शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

द्वारका भुयारी मार्ग गजबजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:45 IST

द्वारकावर होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे गुरफटून जाणारे पादचारी अन् अपघातांना मिळणारे निमंत्रण रोखण्यासाठी द्वारका भुयारी मार्ग पूर्णपणे वापरात आणण्यासाठी शहर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी चर्चा केली आहे. लवकरच भुयारी मार्ग गजबजणार असल्याचा विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ठळक मुद्देपोलिसांचा पुढाकार : विक्रेत्यांना लवकरच मिळणार परवानगी

नाशिक : द्वारकावर होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे गुरफटून जाणारे पादचारी अन् अपघातांना मिळणारे निमंत्रण रोखण्यासाठी द्वारका भुयारी मार्ग पूर्णपणे वापरात आणण्यासाठी शहर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी चर्चा केली आहे. लवकरच भुयारी मार्ग गजबजणार असल्याचा विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.पादचाऱ्यांना द्वारका सहज अन् सुरक्षित ओलांडता यावी यासाठी लाखो रुपये खर्च करून भुयारी मार्ग तयार करण्यात आला, मात्र या भुयारी मार्गाच्या तांत्रिक बाजूच्या त्रुटींमुळे पादचाºयांनी तो नाकारला आणि नशेबाजांनी कालांतराने त्याचा ताबा घेतला. त्यामुळे पादचारी द्वारक ा पुन्हा जीव मुठीत धरूनच ओलांडू लागले.द्वारकेवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना पोलीस आयुक्तालय, शहर वाहतूक शाखेकडून केल्या जात आहेत. यासाठी महामार्ग प्राधिकरण, महापालिका प्रशासनालाही विश्वासात घेतले जात आहे.भुयारी मार्गाची दुरवस्था प्रचंड प्रमाणात झालेली आढळून आली. तसेच त्यामध्ये अस्वच्छतेचे प्रमाण खूप असल्यामुळे पादचारी नागरिकांकडून भुयारी मार्गाचा वापर हळूहळू थांबविला गेला.मात्र आता पुन्हा भुयारी मार्ग वापरात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहे, यासाठी प्राधिकरणाला विविध सूचना देण्यात आल्याचे नांगरे पाटील म्हणाले. भुयारी मार्गाचा पादचाºयांनी सुरक्षेच्या कारणास्तव वापर करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे....असा होणार बदल अन् पालटणार रूपडेसीसीटीव्ही कॅमेरे बसविणार, पायºयांची योग्यप्रकारे दुरुस्ती, पिवळे अंधुक दिवे काढून पांढरे लख्ख प्रकाश देणारे दिवे बसविणार, ठळक अक्षरात सुटसुटीत दिशादर्शक फलक लावणार, पंधरा दिवसांत महामार्ग प्राधिकरणाकडून विक्रेत्यांना व्यवसायास परवानगी, प्रत्येक जिन्यासमोरील अतिक्रमण मनपाच्या मदतीने हटविणार, निर्भया पोलीस व भद्रकाली पोलीस ठाणे बिट मार्शलची नियमित गस्त राहणार, अमली पदार्थांची नशा करणाºयांवर कारवाईचे आदेश.रिक्षा, बसेसला द्वारकेवर थांबण्यास पोलिसांचा मज्जावसध्या द्वारकेच्या चौहोबाजूला रिक्षा थांबे आहेत. यामुळे पुणे महामार्ग, सारडा सर्कल रस्ता, वडाळा नाका समांतर रस्ता, झाकीर हुसेन समांतर रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे द्वारकेवरील सर्व रिक्षा थांबे स्थलांतरित केले जाणार असल्याचे उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.४द्वारका परिसरात कुठेही रिक्षा, खासगी लक्झरी बसेस तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस थांबणार नाहीत, द्वारका थांबा तत्काळ रद्द केला जावा, यासाठी महामंडळाच्या नाशिक विभागाच्या वाहतूक निरीक्षकांसोबतही पत्रव्यवहार केला जाणार आहे, असे चौगुले यांनी सांगितले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी