शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

सारा इच्छुकांचा गलबला...

By admin | Updated: July 9, 2014 01:34 IST

सारा इच्छुकांचा गलबला...

दत्ता महालेआगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा शंखनाद प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होऊ लागला असून, येवला - लासलगाव मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले आहे. विकासाच्या लाटेवर आपणच पुढे आहोत, बाकी मागे कुणीच नाही, असा समज राष्ट्रवादी कॉँग्रेसने करून घेतला आहे. पण, अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र लढणार की स्वतंत्र हे स्पष्ट झालेले नाही. तीच स्थिती शिवसेना-भाजपाची आहे. भाजपा-सेनेची युती झाली आणि सेनेत आपली उमेदवारीही निश्चित झाली म्हणून प्रचार सुरू केला असला तरी, भाजपाही ‘शत-प्रतिशत’ या नाऱ्याखाली स्वतंत्रपणे, अबकी बार राज्यमें भाजपा सरकार म्हणून चाचपणीच्या तयारीला लागल्याने बघता बघता भाजपामध्येही इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे.येवला मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादीचा बोलबोला राहिला असला तरी यावेळच्या विधानसभेची समीकरणे झपाट्याने बदलली आहेत. येवल्याचे विद्यमान आमदार व पालकमंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिर असले तरी स्वपक्षातील काही सहकारी वेगळी चूल मांडून त्यांना आव्हाने देत आहेत. त्यातच छगन भुजबळ येवल्यातून रिंगणात उतरणार की, नांदगावची वाट धरणार यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. दुसरीकडे संभाजी पवार यांनी मातोश्रीवर दस्तक देऊन सेनेची वाट धरली आहे. युतीच्या समीकरणात येथील जागा शिवसेनेच्या वाट्यास असून, ती हक्काचीच समजून हा पक्ष कामाला लागला असला तरी भारतीय जनता पार्टीच्या गोटातही गुप्त हालचाली व उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक जात फॅक्टर, विकास, माधव (माळी, धनगर, वंजारी) युतीचा करिश्मा, केंद्रात व राज्यात एकच सरकार तसेच मूलभूत पाणीप्रश्नासह विकास या मुद्द्यावरून लढविली जाईल. सध्या तरी प्रत्येक पक्षात विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची इच्छा असणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे...‘सुरक्षित’ राष्ट्रवादीची सावध पावले !विधानसभेत सलग दोनवेळा येवला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासारख्या ‘हेवीवेट’ नेत्यामुळे येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे यंदाही भुजबळ येवल्यातूनच रिंगणात उतरणार असल्याचे सुस्पष्ट आहे. अर्थात असे असले तरी अन्य राजकीय समीकरणे सोडविताना ऐनवेळी भुजबळ यांनी आपला मतदारसंघ बदलत नांदगावमधून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला, तर येवल्यातून राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून समीर अथवा पंकज भुजबळ यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. जर भुजबळ परिवारातील कोणीच रिंगणात नसेल तर अशा स्थितीत उमेदवारीसाठी अ‍ॅड. माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, नरेंद्र दराडे यांच्यात रस्सीखेच राहील. सद्यस्थितीत बनकर यांनी भुजबळ यांचे उघड उघड समर्थन केले आहे. शिंदे यांनी मात्र ‘थांबा आणि पाहा’ अशी भूमिका घेतली आहे तर दराडे यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थिती सुरक्षित वाटत असली तरी या पक्षाकडून मात्र सावध पावले उचलली जात आहेत.काँग्रेसमध्येही स्वबळाचे वारेदहा वर्षांपूर्वी छगन भुजबळ यांच्यासाठी कॉँग्रेसने आघाडीच्या समीकरणांमध्ये त्यांच्या वाट्यास असलेला येवला मतदारसंघ राष्ट्रवादी कॉँग्रेसला बहाल केला होता. यावेळी आघाडी कायम राहिली आणि भुजबळ रिंगणात नसतील तर कॉँग्रेस पुन्हा या जागेवर दावा करण्याची शक्यता आहे. असे झाले किंवा आघाडीच राहिली नाही तर स्वबळावर लढण्याचे जोरदार वारे कॉँग्रेसमध्ये वाहू लागले आहेत. तशी वेळ आलीच तर येथून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी नानासाहेब पाटील, तात्या लहरे, प्रमोद पाटील, एकनाथ गायकवाड यांची दावेदारी राहण्याची शक्यता आहे. नानासाहेब पाटील हे माजी आमदार दत्ताजी पाटील यांचे सुपुत्र असून, सध्या लासलगावचे सरपंच आहेत. लहरे यांनी १९८५मध्ये काँग्रेसकडून तत्कालीन पुलोद आघाडी विरोधात नशीब अजमाविले होते. थोडक्यात सांगायचे तर राज्यात काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर भुजबळ यांच्यासारख्या हेवीवेट नेत्याशी सामना करतानाच शिवसेनेच्या उमेदवाराशीही दोन हात करण्याची कसरत कॉँग्रेसला करावी लागेल. शिवसेनेच्या आशा वाढल्यायुतीच्या संसारात येवल्याची जागा शिवसेनेच्या वाट्यास आहे. भुजबळ यांचे येवल्यात आगमन होण्याआधी या मतदारसंघावर शिवसेनेने चांगले वर्चस्व प्राप्त केले होते. गेल्या दशकात मात्र येवल्यातील सारेच राजकारण भुजबळ केंद्रित झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र मोदी लाटेत खुद्द भुजबळच निष्प्रभ ठरल्यामुळे महायुतीच्या गोटात उत्साह असून, शिवसेनेकडून नशीब अजमाविण्याची आस अनेकांना लागली आहे. संभाजी पवार यांनी खांद्यावर भगवा घेतला. त्यांना तेथे उमेदवारीचा शब्द दिला गेला असण्याची शक्यता असून, त्यानुसार ते ‘कामा’ला लागल्याचे चित्र आहे. अर्थात राजकारण अनाकलनीय खेळ आहे हे लक्षात घेता माजी आमदार कल्याणराव पाटील, सर्जेराव सावंत आणि सध्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये असलेले नरेंद्र दराडे, पंढरीनाथ थोरे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची आशा आहे. गतवेळी अपक्ष रिंगणात उतरलेले शिवाजी मानकर यांचेही नाव स्पर्धेत आहे. भाजपात इच्छुकांची यादी मोठी !लोकसभेच्या सलग तीन निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवारास आघाडी असते, मात्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार असतो याचे शल्य आणि सलग दोन वेळा शिवसेनेचा झालेला पराभव पाहता युतीच्या समीकरणात येवल्याची जागा भाजपाला द्यावी, असा मतप्रवाह आहे. तसे झाल्यास वा भाजपाने स्वतंत्रपणे रिंगणात उतरायचे ठरविल्यास या पक्षाकडून प्रमोद सस्कर, बंडू क्षीरसागर, आनंद शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी राष्ट्रवादीचे भुजबळ आणि शिवसेनेचे पवार यांच्याशी सामना करू शकतील असा पर्याय म्हणून भाजपाकडून नरेंद्र दराडे यांच्यासाठी पायघड्या अंथरल्या जाऊ शकतात. याशिवाय भाजपात कैलास सोनवणे, अ‍ॅड. एन.डी. कुलकर्णी, तुकाराम वाळूंज, गोरख खैरनार, भाऊसाहेब लहरे, नंदकिशोर शिंदे, राजेंद्र मगर, एकनाथ साताळकर, राजेंद्र चाफेकर, श्रीकांत गायकवाड अशी इच्छुकांची भली मोठी यादी आहे.