शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बस चालकांच्या मुजोरीपुढे विध्यार्थी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 16:56 IST

ओझर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असताना बस येऊन थांबत नसल्याने विध्यार्थी वैतागले आहे.यामुळे दोन तीन तास कॉलेज स्टॉपवर उभे राहून विध्यार्थी महामार्गावरील वाहनांच्या वेगाचा सामना करत आहे.

ठळक मुद्देओझर :  न्याय न मिळाल्यास महामार्गावर करणार रास्तारोको बस असून थांबत नसल्याने तीन तास जातात वाया

ओझर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असताना बस येऊन थांबत नसल्याने विध्यार्थी वैतागले आहे.यामुळे दोन तीन तास कॉलेज स्टॉपवर उभे राहून विध्यार्थी महामार्गावरील वाहनांच्या वेगाचा सामना करत आहे.ओझर महाविद्यालयाजवळील थांबा मृत्यूचे केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे आहेत. ओझर येथील महाविद्यालय महामार्गावरील टिळक नगर समोर असून सकाळी कॉलेज सुटण्याची वेळ अकराची असताना सुकेणे बस साडेदहा ला येऊन जात असल्याने त्यानंतर तब्बल दीड वाजेपर्यंत मुलं मुली भर उन्हात याच दरम्यान काही बस चालक मात्र थांबा असताना सरळ निघून जात असल्याने अनेक जण बस पकडण्याच्या नादात खाली पडले आहे. एकीकडे भुयारी कामामुळे सर्व वाहन सर्व्हिस रोड ने जात असून त्याच ठिकाणी जीव मुठीत धरून कमी जागेत हे सर्व विद्यार्थी उभे असतात.दिक्षी,जिव्हाळे,दात्याने,थेरगाव,ओने व कसबे मौजे सुकेणे मोहाडी जानोरी आंबे जानोरी शिवणई आदी ठिकाणाहून तिनशेच्या आसपास मुलं दररोज प्रवास करतात.याविषयी सीबीएस येथून त्यावेळी सुटणारी बस तेथूनच अर्धा तास उशिराने सुटल्यास त्याचा लाभ सर्वांनाच होणार आहे.त्यामुळे एसटी प्रशासनाने सदर गंभीर बाबींची तातडीने दखल घेण्याची गरज असून त्यामुळे सर्वांचीच वेळेची बचत होऊन अपघातांना आमंत्रण मिळणार नाही.

सदर ठिकाणी अंदारपासचे काम चालुअसल्याने तात्पुरते निवारा शेड उभारण्यात यावे तसेच काही सिटीबस चे वाहक चालक बस रिकामी असताना देखील येथे थांबण्यास आळस करतात त्यामुळे याठिकाणी महामार्गावर अधिकृत थांबा असताना बस पकडायची गरज काय असा सवाल विद्यार्थी विचारत आहे. 

काही सिटीबस चालक स्वत:च्या मालकीची गाडी असल्याचे आव आणून विद्यार्त्यांना त्रास देतात.एक बस निघून गेल्यावर तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे.पिंपरी बस दहाव्या मैलापासून वळण घेत असताना पर्यंत देखील वाहक बसण्यास मज्जाव करतात परिणामी कडक उन्हात एकदीड किलोमीटर पायी जावे लागते.अभिषेक कुलकर्णीविध्यार्थी, मोहाडीओझर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्नाबाबत अनेक तक्र ारी आल्या आहेत.सदर बाब पिंपळगाव आगारप्रमुखांना सांगितली असून आजपासून दोन भरारी पथके याठिकाणी चार तास थांबून कारवाही करणार आहे.नितीन मैन्डविभागप्रमुख नाशिक.