शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजार झाडांचे विद्यार्थ्यांनी केले जतन

By admin | Updated: June 27, 2017 00:37 IST

नाशिक : केवळ झाडांची रोपे लावून त्याकडे वळूनही न बघता पुन्हा पुढील वर्षी त्याच खड्ड्यात झाडांचे रोप लावण्याचा प्रकार सरकारी यंत्रणेकडून घडतो.हिंगणवेढे येथील शाळेचे विद्यार्थी याला अपवाद आहे.

मुकुंद बाविस्कर । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केवळ झाडांची रोपे लावून त्याकडे वळूनही न बघता पुन्हा पुढील वर्षी त्याच खड्ड्यात झाडांचे रोप लावण्याचा प्रकार सरकारी यंत्रणेकडून घडतो. परंतु हिंगणवेढे येथील शाळेचे विद्यार्थी मात्र याला अपवाद आहे. एक- दोन दिवस किंवा महिनाभर नव्हे तर वर्षभर पाणी घालून या विद्यार्थ्यांनी सुमारे अडीच हजार झाडे जगविली आहेत. विशेष म्हणजे पुन्हा यंदाही सीड बँकेचा उपक्रम राबवून आठ हजार बियांचे माळरान आणि डोंगरावर रोपण केले. नाशिक तालुक्यातील हिंगणवेढे येथील वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या संत जनार्दन स्वामी माध्यमिक विद्यामंदिर शाळेने पर्यावरण संवर्धनासाठी अनोखा उपक्रम राबविला आहे. शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव कुटे आणि शिक्षकांनी उन्हाळ्याची सुटी लागण्यापूर्वी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सुटीमध्ये जांभूळ, कडूलिंब, रिटा, चिंच, बाभूळ, आंबे, बोर, लिंबू, सीताफळ आदि झाडांच्या बिया जमा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सुमारे आठ हजार बिया जमा केल्या. त्या सर्व बिया शेण मातीच्या गोळा करून छोट्या छोट्या खड्ड्यांमध्ये टाकण्यात आल्या. हिंगणवेढे येथील पाच एकर सरकारी गायरान जमिनीवर तसेच परिसरातील डोंगरावर छोटे-छोटे खड्डे घेऊन त्या गोळा केलेल्या दोन बिया खड्ड्यामध्ये टाकण्यात आल्या. गेल्या आठवड्यात शुक्रवारी (दि. २३) सदर उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर शनिवारी परिसरात दिवस पाऊस आल्याने बियारोपण उपक्रमाला पूरक ठरला.  दरम्यान, मागील वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांनी एक एकर परिसरात सुमारे तीन हजार रोपांची लागवड केली होती. त्यातील सुमारे अडीच हजार रोपे जीवंत असून, विद्यार्थ्यांनी सदर रोपांची नियमित काळजी घेत आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यानंतर तसेच वेळ मिळेल तेव्हा विद्यार्थी या झाडांना पाणी घालतात, असे मुख्याध्यापक साहेबराव कुटे यांनी सांगितले. तसेच शाळेतील शिक्षक वाय. एस. चव्हाण, एस. एन. बोडके, राजेंद्र बच्छाव, अर्चना गायकवाड, विलास दरगुडे, ज्ञानेश्वर गिते आदि शिक्षक यासाठी सहकार्य करतात.