शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाण्यातील विद्यार्थिनींना विषबाधारुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:08 IST

सुरगाणा : तालुक्यातील माणी येथील आदिवासी विकास विभाग प्रकल्पांतर्गंत येणाºया कन्या आश्रमशाळेतील सहा मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी (दि. १६) घडली. शासकीय पोषण आहाराचे सेवन केल्यानंतर ही घटना घडली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.या संदर्भात अधिक वृत्त असे, माणी येथील कळवण आदिवासी विकास विभाग प्रकल्पातर्गंत येणाºया आश्रमशाळेतील ...

ठळक मुद्दे नाशिक: विद्यार्थिनींनी खिचडी खाल्ल्याने होऊ लागला त्रासआदिवासी विकास विभाग प्रकल्पांतर्गंत येणाºया कन्या आश्रमशाळेतील सहा मुलींना अन्नातून विषबाधा

सुरगाणा : तालुक्यातील माणी येथील आदिवासी विकास विभाग प्रकल्पांतर्गंत येणाºया कन्या आश्रमशाळेतील सहा मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी (दि. १६) घडली. शासकीय पोषण आहाराचे सेवन केल्यानंतर ही घटना घडली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.या संदर्भात अधिक वृत्त असे, माणी येथील कळवण आदिवासी विकास विभाग प्रकल्पातर्गंत येणाºया आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी खिचडी खाल्ल्याने त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जास्त त्रास झालेल्या गंभीर रुग्णांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रु ग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.डॉ. मधुकर पवार, डॉ. मीनाक्षी जगताप, डॉ. लीना टाके यांनी विषबाधितांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान भाग्यश्री देशमुख हिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या आश्रमशाळेत ७७१ मुली निवासी असून, बोरपाडा येथील बंद करण्यात आलेल्या आश्रमशाळेतील दोनशे सहा मुलींचा त्यात समावेश आहे. घटनेचे वृत्त समजताच तहसीलदार दादासाहेब गिते, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, तालुका वैद्यकीय अधिकारी एच.के. नेहते यांनी आश्रमशाळेची पाहणी केली.  मुलींमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण केवळ तीन ते चार टक्के आढळून आले. तसेच जेवणाचे ताट, स्वच्छ ठेवले जात नाही. आदि कारणामुळे त्यांना त्रास झाला असावा. अन्नाचे नमुने तपासणीसाठी नाशिक येथील फॉरेन्सिक प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर खरे कारण समजू शकेल, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी एच. के. नेहते यांनी दिली.सुरगाणा व करंजुल आश्रम शाळेतील स्वच्छते विषयी दोन महिन्यांपुर्वी कळवण प्रकल्प अधिकाºयाकडे तक्र ार केली होती. त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही. वेळीच दखल घेतली असती तर ही वेळ आली नसती. या बाबत सखोल चौकशी करण्यात यावी.- सुरेश गवळी - भाजप तालुका अध्यक्षविषबाधा झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून, दोषीवर कारवाई करावी, शासनाने स्वच्छते बाबतीत डोळेझाक करू नये, आदिवासी मुलांची हेळसांड थांबवावी. - जयश्री पवार जिल्हा परिषद सदस्याविषबाधा झालेल्या विद्यार्थिनीत कमल गोविंद भोये (११वी विज्ञान, रा. धामणकुंड), मनीषा काशीनाथ दळवी (९ वी, रा. अळीवपाडा), हेमलता रघुनाथ चौधरी (११ वी विज्ञान), भाग्यश्री दौलत देशमुख (९ वी, रा. अळीवपाडा), भाग्यश्री काशीनाथ दळवी (११ वी कला शाखा) यांच्यासह अन्य एका विद्यार्थिनींचा समावेश आहे. या शासकीय कन्या आश्रमशाळेत पाचशे विद्यार्थिनी सध्या शिक्षण घेत आहेत.