शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी घेत विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:10 IST

नाशिक : अठरा वर्षीय विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी (दि़१८) सकाळच्या सुमारास डोंगरे वसतिगृह मैदानाजवळील व्ही़ एऩ नाईक महाविद्यालयात घडली़ काजल संजय साळवे (१८, शिवाजीनगर, सातपूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, बारावीच्या वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होती़

नाशिक : अठरा वर्षीय विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी (दि़१८) सकाळच्या सुमारास डोंगरे वसतिगृह मैदानाजवळील व्ही़ एऩ नाईक महाविद्यालयात घडली़ काजल संजय साळवे (१८, शिवाजीनगर, सातपूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, बारावीच्या वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होती़ दरम्यान, आत्महत्त्येचा कारणाचा शोध लागेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतल्याने जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता़सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काजल साळवे ही सकाळी ८ वाजेच्या सुमारास महाविद्यालयात सुरू असलेल्या बारावी वाणिज्यचे पेपर देण्यासाठी आली होती़ पेपर दिल्यानंतर सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास ती अभियांत्रिकी महाविद्यालय असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर गेली व तिथून तिने खाली उडी मारली़ यामध्ये तिचे डोके, तोंड व दोन्ही हातास मार लागल्याने ग्रंथपाल भाऊसाहेब केदार यांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी गायधनी यांनी तपासून मयत घोषित केले़या घटनेनंतर सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ़ सीताराम कोल्हे हे अधिकारी व कर्मचाºयांसह त्वरित महाविद्यालयात पोहोचले व घटनेची माहिती घेतली़ या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत एकच आक्रोश केला़ मुलीच्या कुटुंबीयांनी घरातील वातावरण चांगले असून, मुलगी आत्महत्या करूच शकत नाही असे सांगत शहरात अफवांना ऊतनाईक महाविद्यालयातील विद्यार्थिनीने सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त शहरात कळताच विविध अफवांना ऊत आला होता़ इमारतीवरून पडल्याने काजलच्या हातावर जखमा झालेल्या असल्याने काहींनी ब्ल्यू व्हेल गेममुळे आत्महत्या केल्याची आवई उठविली होती़ मात्र, पोलीस तपासानंतरच आत्महत्येचे खरे कारण समोर येणार आहे़, तर मुलीच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात आलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली़