शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सेंट्रल किचनला विद्यार्थ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:18 IST

आदिवासी विकास विभागाच्या जिल्ह्यातील सुमारे चाळीस वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अचानक सेंट्रल किचनमधून जेवण पुरविण्यास सुरुवात करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण पोहचत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास कार्यालयात प्रकल्प अधिकाºयांना घेराव घातला. विशेष म्हणजे सकाळपासून जेवणच न मिळाल्याने उपाशीपोटी आंदोलन करणाºयांपैकी एका विद्यार्थ्याला चक्कर येऊन तो पडल्याचीही घटना घडली.

नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या जिल्ह्यातील सुमारे चाळीस वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अचानक सेंट्रल किचनमधून जेवण पुरविण्यास सुरुवात करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण पोहचत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास कार्यालयात प्रकल्प अधिकाºयांना घेराव घातला. विशेष म्हणजे सकाळपासून जेवणच न मिळाल्याने उपाशीपोटी आंदोलन करणाºयांपैकी एका विद्यार्थ्याला चक्कर येऊन तो पडल्याचीही घटना घडली. आदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला केटरर्स ठेकेदारांमार्फत जेवण पुरविले जाते. यासाठी अनेक ठेकेदार असल्याने सदर ठेकेदारांमार्फत विद्यार्थ्यांना सकाळचा नास्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना सेंट्रल किचन व्यवस्थेच्या माध्यमातून साउथ इंडियन नास्ता आणि जेवण मिळू लागल्याने याप्रकरणी विद्यार्थ्यांनी तक्रारही दाखल केली होती. मात्र नवीन निविदा निघाल्याने एकाच ठेकेदाराकडून जेवण येत असल्याचे त्यांना सांगण्यात येत होते.  मात्र विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून जेवण पुरविले जात असल्यामुळेच जेवण मिळण्याबाबत अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे तसेच साउथ इंडियन जेवण दिले जात असल्याची बाब विद्यार्थ्यांना समजली. रविवारी विद्यार्थ्यांना सकाळचा नास्ता आणि जेवणच उपलब्ध न झाल्याने या विद्यार्थ्यांनी आदिवासी विभागाचे प्रकल्प कार्यालय गाठून तीव्र घोषणाबाजी करीत सेंट्रल किचन व्यवस्था बंद करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांनी सकाळपासून सुरू केलेल्या आंदोलनानंतर दुपारी प्रकल्प अधिकारी अमोल हेडगे दाखल झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना घेराव घातला. मात्र त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन रात्री सुरूच होते.सकाळपासून उपाशीपोटी आंदोलन सुरू असल्याने आंदोलनकर्त्या एका विद्यार्थ्याला चक्कर आली. त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान उशिरापर्यंत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते.मंत्र्यांशी चर्चाआदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याशी चर्चा करण्यात आली. मात्र त्यांनी याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका मांडली नसल्याने आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नसल्याचे आंदोलनाचे नेतृत्व करणारे लकी जाधव यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या रोजच्या अन्नाचा प्रश्न असतानाही प्रशासनाकडून फारसे गांभीर्य दाखविले जात नसल्याचा आरोप जाधव यांनी केला.गुन्हे दाखल कराआदिवासी विद्यार्थ्यांच्या बाबतीत गांभीर्य न दाखविता अचानकपणे सेंट्रल किचनची व्यवस्था करणे ही बाब म्हणजे आदिवासी वसतिगृह बंद करण्याचा शासनाचा घाट आहे. सेंट्रल किचनमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण मिळत नाही. पोळ्या काळ्या पडतात. अन्न थंड असते. शिवाय साउथ इंडियन जेवण आदिवासी विद्यार्थ्यांना दिले जाते. मुलांना हे जेवण पचत नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाºया प्रकल्प अधिकाºयांवर प्रसंगी गुन्हे दाखल करा.- लकी जाधव, विद्यार्थी प्रतिनिधी