शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जखमी श्वानाला विद्यार्थ्यांनी दिले जीवदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:36 IST

पिसाळलेल्या बैलाला जेसीबीच्या साहाय्याने निर्दयपणे जीवे मारणाऱ्या माथेफिरूंचे वृत्त काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवर आले होते. मुक्या प्राण्यांचा अमानुषपणे छळ करून त्यांचे हाल करणारी माणसे जशी आपल्याला पाहायला मिळतात तशीच या प्राण्यांची काळजी घेऊन त्यांच्यावर कोसळलेल्या संकटातून त्यांची सुटका करणारी माणसेही या जगात आहेत. याच गोष्टीचा प्रत्यय देणारी घटना तालुक्यातील जळगाव निंबायती येथील गो. य. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात अनुभवायला मिळाली.

ठळक मुद्देजळगाव निंबायती : गो. य. पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांची भूतदया

जळगाव निंबायती : पिसाळलेल्या बैलाला जेसीबीच्या साहाय्याने निर्दयपणे जीवे मारणाऱ्या माथेफिरूंचे वृत्त काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवर आले होते. मुक्या प्राण्यांचा अमानुषपणे छळ करून त्यांचे हाल करणारी माणसे जशी आपल्याला पाहायला मिळतात तशीच या प्राण्यांची काळजी घेऊन त्यांच्यावर कोसळलेल्या संकटातून त्यांची सुटका करणारी माणसेही या जगात आहेत. याच गोष्टीचा प्रत्यय देणारी घटना तालुक्यातील जळगाव निंबायती येथील गो. य. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात अनुभवायला मिळाली.भटक्या श्वानांच्या भांडणात जखमी अवस्थेतील एका श्वानाने गो. य. पाटील विद्यालयाच्या एक वर्गखोलीत आश्रय घेतला. थंडीपासून व इतर श्वानांपासून बचावासाठी नकळतपणे येऊन लपलेले हे श्वान कोणाच्याही निदर्शनास आले नाही. शाळा सुटली तसे विद्यार्थी व शिक्षक वर्गखोल्या बंद करून घरी गेले. बाहेर निघण्याचा प्रयत्नात श्वानाची खिडकीच्या लोखंडी चौकटीत मान पूर्ती अडकली, त्याने खूप झटापट करून निघण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्याचे हे प्रयत्न अपयशी ठरले. तद्नंतर त्याने जोरजोरात भुंकण्यास सुरु वात केली.मात्र रात्रीच्या वेळी घडलेला प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. सकाळच्या सुमारास कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी वर्गखोलीत आले असता सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. बघ्यांची मोठीगर्दी झाली होती. अशावेळी सौरभ शिंदे व त्याचा मित्र सतीश कोरे, आशिष ढोणे, शुभम पवार, विशाल कांबळे व संदीप घुगे यांनी सुटकेसाठी जिवाचा आटापिटा करून विव्हळत असलेल्या श्वानाला लोखंडी चौकटीतून बाहेर काढण्याचाप्रयत्न केला, मात्र श्वानाचे डोके चौकटीतील मधल्या भागात अडकल्यामुळे त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते. शिवाय रात्रभर सुटकेचा प्रयत्न करणारा श्वान चावा घेण्याची शक्यता होती.यावेळी प्राध्यापक अमोल आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून हॅक्सॉ ब्लेड आणण्यात आले व अतिशय सावधगिरीने श्वानाला कुठलीही इजा न होऊ देता, तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षितता विचारात घेता त्या खिडकीची लोखंडी चौकट हळूहळू कापण्यात आली. जवळपास दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर त्या जखमी अवस्थेतल्या श्वानाची सुखरूप सुटका झाली. श्वानाने एकच पळ काढल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.पाटील विद्यालयाच्या एक वर्गखोलीत खिडकीच्या जाळीतील लोखंडी चौकटीत श्वानाची मान अडकली होती. विद्यार्थ्यांनी सावधगिरीने श्वानाला कुठलीही इजा न होऊ देता, खिडकीची लोखंडी चौकट हळूहळू कापली व कुत्र्याची सुखरुप सुटका झाली. विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या या धाडसाचे संस्था अध्यक्ष कासूताई पाटील, सचिव महेंद्र पाटील, निंबाजी शिंदे, प्राचार्य जी. एस. फसाले, प्रा. पी. जी. माने, एस. टी. जाधव, पी. यू. शिंदे, सी. डी. राजपूत, डी. एस. जमधाडे वप्रा. अमोल अहिरे यांनी कौतुक केले.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचार