दिंडोरी : कादवा कारखाना कार्यस्थळावरील प्राथमिक विद्यामंदिर, राजारामनगर शाळेत हरितकुंभ व दीपावलीच्या पार्श्वभूमीवर ज्ञानदीपोत्सव-२०१४ उपक्रमाचे आयोजन व त्या निमित्ताने विद्यार्थी संचिका व हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन मान्यवर व पालकांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कादवा सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते. ज्ञानदीपोत्सवासारखा उपक्रम, विद्यार्थी व पालकांचा लक्षणीय सहभाग यावरून शिक्षक, पालक व उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक शिंदे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर श्वेता काळोगे या विद्यार्थिनींने फटाके न उडविण्याची व प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी राजेंद्र गांगुर्डे यांनी स्पर्धात्मक युगातील शिक्षण व पालकांची भूमिका यावर मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गांगुर्डे, किशोर जाधव, संस्थेचे सचिव त्र्यंबक संधान, संचालक मधुकर गटकळ, रघुनाथ जाधव, संपत गटकळ, मुख्याध्यापक दीपक पाटील व पालक वर्ग उपस्थित होता. सूत्रसंचालन सरला पगार व अर्चना डोखळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती गटकळ, आहेर, कदम, पगार, डोखळे, गोजरे व मनोज मौले, सोमनाथ गटकळ यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांची फटाकेविना दिवाळी साजरी
By admin | Updated: October 22, 2014 22:22 IST