शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी सेनेचे ‘फडणवीस वॉटरपार्क’ आंदोलन

By admin | Updated: July 15, 2017 00:35 IST

सातपूर : पावसामुळे सातपूर येथील मनपाच्या विभागीय कार्यालयासमोर साचलेल्या पावसाच्या पाण्याला ‘फडणवीस वॉटरपार्क’ची उपमा देत सातपूर विद्यार्थी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सातपूर येथील मनपाच्या विभागीय कार्यालयासमोर साचलेल्या पावसाच्या पाण्याला ‘फडणवीस वॉटरपार्क’ची उपमा देत सातपूर विद्यार्थी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पावसाचे तळे साचले होते. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. वाहनधारकांना कसरत करत वाहने चालवावी लागत होती. यास महापालिकेला जबाबदार धरीत सातपूर शिवसेनेच्या वतीने महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. शिवसेना भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश बेलदार यांच्या नेतृत्वाखाली राजाभाऊ क्षीरसागर, संदीप गायकर, देवा जाधव, अमोल सूर्यवंशी, वैभव ढिकले, किशोर निकम, प्रमोद जाधव, मंगेश पवार, आकाश मोराडे, स्वप्नील पासले, स्वप्नील घोडके, ललित वाघ, नंदेश ढोले, धनंजय तांदळे आदींसह शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी भाजपा व मनपा प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.