शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसह प्रज्ञावंत व्हावे

By admin | Updated: July 25, 2016 00:24 IST

देवयानी फरांदे : माळी समाजाकडून ४५० गुणवंतांचा गौरव

नाशिक : आजचे जग हे स्पर्धेचे असून, विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उतरताना केवळ गुणवत्तेच्या मागे न लागता, गुणवत्तेसोबतच प्रज्ञावंत होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले.प. सा. नाट्यगृहात रविवारी (दि.२४) माळी समाजाच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात फरांदे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी समाज महासंघाचे सरचिटणीस अविनाश ठाकरे होते. व्यासपीठावर अखिल भारतीय समता परिषदेचे सरचिणीस डॉ. कैलास कमोद, बाळासाहेब माळी, अनंता सूर्यवंशी, संतू पाटील, दत्तात्रय माळी, सुरेश खोडे, प्रताप गायकवाड, मनीष जाधव, बाबासाहेब जेजूरकर, रंजना शेलार, सुभाष सोनवणे, कुसुम शिंदे, नगरसेवक अर्चना थोरात, संदीप लेनकर, धनंजय पवार, देवराम पवार, राजेंद्र ताजने आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. फरांदे म्हणाल्या, माळी समाजाचा इतिहास पुरोगामी विचारसरणीचा आहे. महात्मा जोतिराव फुले यांनी सावित्रीबार्इंना शिक्षण दिले. त्यांना महिला शिक्षणासाठी प्रेरित केले. सावित्रीबार्इंनी सुरू केलेल्या स्त्री शिक्षणाच्या कार्यामुळेच आपल्यासारखी एक महिला प्राध्यापक तसेत विधिमंडळाच्या सदस्यपदापर्यंत पोहोचू शकल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धेच्या युगाला सामोरे जाताना सर्वांगीण ज्ञान प्राप्त करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक विजय राऊत यांनी केले, तर सूत्रसंचालन रेखा महाजन यांनी केले.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माळी समाजाकडून दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी व व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यात मयूर विधाते, रोहित घोडके, स्नेहल विधाते, सुरूची भुजबळ, सुनील अहेर, अथर्व फरांदे, आदित्य थोरात आदि विद्यार्थ्यांसह जी. पी. खैरनार यांना यावेळी गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)