शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:12 IST

अकरावी प्रवेशासाठी नशिक महानगरपालिका केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांकडून निकालापूर्वीच ऑनलाईन अर्जाचा भाग एक ...

अकरावी प्रवेशासाठी नशिक महानगरपालिका केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांकडून निकालापूर्वीच ऑनलाईन अर्जाचा भाग एक भरून घेतला जातो. मात्र यावर्षी परीक्षाच झाल्या नसल्याने निकालाविषयी संभ्रम निर्माण झाला होता. अखेर राज्य सरकारने दहावीचा निकाल तयार करण्यासाठी अंतर्गत मूल्यमापनाची पद्धती जाहीर करून अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालासोबत अकरावीची प्रवेश प्रकिया केव्हा जाहीर होणार याची प्रतीक्षा लागली आहे. नाशिक शहरात अकरावीच्या प्रवेशासाठी २५ हजार २७० जागा उपलब्ध आहे. त्यात नवीन वर्षात कमी झालेल्या तुकड्या अथवा नवीन महाविद्यालयांची भर पडल्यास बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालकांना कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाही. त्यामुळे अकरावीचे प्रवेश नियमित ऑनलाईन पद्धतीने होणार की यातही बदल होणार याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

इन्फो

दहावीच्या निकालाची मूल्यमापन पद्धती जाहीर झाली असली तरी अद्याप अकरावी प्रवेशासाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांची व उपलब्ध जागांची नोंदणी प्रक्रिया व ऑनलाईन अर्जचा भाग भरण्याची प्रक्रिया केव्हा सुरू होणार याविषयी अद्यापही अस्पष्टता आहे. त्यामुळे शहरातील अकरावी प्रवेश प्रक्रियेविषयी स्पष्ट निर्णय जाहीर करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.

इन्फो-

शहरात विज्ञान शाखेच्या सर्वाधिक जागा

शिक्षण विभागाने मागील वर्षी शहरात राबविलेल्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेनुसार नाशिक महानगरपालिका क्षेत्रात जवळपास ६० कनिष्ठ महाविद्यालये आहे. यातील २५ हजार २७० जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. शहरात विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १० हजार १६० जागांचा समावेश आहे. त्याखालोखाल वाणिज्य शाखेच्या ८ हजार ६०० जागा आहे. तर कला शाखेच्या ४ हजार ९१० व एमसीव्हीसीच्या १३६० जागांचा समावेश आहे.