शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नोकरदारांप्रमाणे विद्यार्थ्यांनाही बायोमेट्रिक हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:09 IST

महाराष्ट्र राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील (विज्ञान शाखा) विद्यार्थी नियमित वर्गांना उपस्थित न राहता फक्त प्रात्यक्षिक वर्गाला उपस्थित राहतात व नियमित वर्गाऐवजी कोचिंग क्लासमध्ये उपस्थित राहतात. तसेच अनेक महाविद्यालयांनी यासाठी खासगी शिकवणी वर्गांसोबत सामंजस्य करारही केले आहेत.

नाशिक : महाराष्ट्र राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील (विज्ञान शाखा) विद्यार्थी नियमित वर्गांना उपस्थित न राहता फक्त प्रात्यक्षिक वर्गाला उपस्थित राहतात व नियमित वर्गाऐवजी कोचिंग क्लासमध्ये उपस्थित राहतात. तसेच अनेक महाविद्यालयांनी यासाठी खासगी शिकवणी वर्गांसोबत सामंजस्य करारही केले आहेत. या प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेत कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ४ एप्रिल रोजी दादर येथील दहावीच्या नवीन अभ्यासक्रमासंदर्भातील चर्चासत्रात अशा प्रकारे बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी पद्धत राबविण्याची घोषणा केली होती. या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण व क्र ीडा विभागाने शुक्रवारी (दि. १५) शासननिर्णय जाहीर केला असून, पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक व औरंगाबाद या पाच विभागांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकमधील विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागणार असून, महाविद्यालयांशी सामंजस्य कराराद्वारे खासगी कोचिंग क्लास चालविणाºयांनाही वेळापत्रकाचे फेरनियोजन करावे लागणार आहे. राज्यातील विज्ञान शाखा असलेल्या खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व स्वयंअर्थसहायित कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अशा प्रकारची हजेरी प्रणाली सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री कनिष्ठ महाविद्यालयांनी शासननिर्णय निर्गमित झाल्यापासून एक महिन्याच्या आत उपलब्ध करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. माध्यमिक शिक्षण निरीक्षकांनी त्यांच्या भागातील कनिष्ठ महाविद्यालयांत बायोमेट्रिक हजेरी प्रणालीची तपासणी करून यासंदर्भातील अहवाल शासनाला सादर करण्यासोबतच संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना वेळोवेळी आकस्मिक भेट देऊन बायोमेट्रिक उपस्थितीचा आढावा घेण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत.

टॅग्स :collegeमहाविद्यालय