शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बससाठी विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:24 IST

बसच्या वाढत्या तक्रारींमुळे चांदोरी आणि परिसरातील विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनी बस डेपोत येत नाही तसेच महामार्गावरदेखील बस थांबत नसल्याने पुन्हा एकदा परिवहन महामंडळाच्या विरोधात एल्गार पुकारल्याने नाशिक-औरंगाबाद महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.

सायखेडा : बसच्या वाढत्या तक्रारींमुळे चांदोरी आणि परिसरातील विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनी बस डेपोत येत नाही तसेच महामार्गावरदेखील बस थांबत नसल्याने पुन्हा एकदा परिवहन महामंडळाच्या विरोधात एल्गार पुकारल्याने नाशिक-औरंगाबाद महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. बसचालक व वाहक यांच्या मनमानीमुळे आठवड्याभरात तिसºयांदा नागरिकांना परिवहन महामंडळाच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे. बसविरोधात वारंवार आंदोलने करावी लागत असल्याने चांदोरी आंदोलनाचे केंद्रबिदू ठरू पाहत आहे.येथील स्थानकात लासलगाव डेपोच्या बसेस येत नसल्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अनेकदा तक्ररी करूनही बस येत नसल्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी अचानक विद्यार्थी व प्रवाशांनी नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील चांदोरी चौफुलीवर रास्ता रोको करत रोष व्यक्त केला. पंधरा ते वीस मिनिटांच्या आंदोलनानंतर बसेस स्थानकात आणण्यात आल्या. बस येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पाहून ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब खरात, समाजसेवक पांडुरंग पगारे, सोमनाथ कोटमे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. लासलगाव डेपोच्या सर्व बसेस स्थानकात नियमित याव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.