शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

शाळा प्रशासनाविरुद्ध विद्यार्थी-पालकांची साक्ष

By admin | Updated: June 11, 2017 00:21 IST

इंदिरानगर : येथील केंब्रिज शाळा प्रशासनाच्या अरेरावीमुळे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची साक्ष घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : येथील केंब्रिज शाळा प्रशासनाच्या अरेरावीमुळे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची साक्ष घेण्यात आली. तसेच घटनास्थळाचा पंचनामाही करण्यात आला आहे.केंब्रिज शाळेच्या सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना दाखले पाठविल्याने आणि सुमारे पंधरा विद्यार्थ्यांना फी न भरल्याने वर्गाबाहेर काढून शाळेच्या प्रांगणात बसविण्यात आले होते. तसेच शुक्रवारी (दि. ९) प्रभागातील नगरसेवक आणि आमदारांनाही अरेरावीचा अनुभव आला.तीन दिवसांपूर्वीच केंब्रिज शाळेचे वाढीव शुल्क न भरल्याच्या कारणावरून सुमारे दीडशे विद्यार्थ्यांच्या घरी शाळा सोडल्याचे दाखले पाठवून दिले होते. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पालकांनी लढा अधिक तीव्र करत शुक्रवारी (दि. ९) सकाळपासून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले होते. घटनास्थळी नगरसेवक सतीश सोनवणे, सुप्रिया खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी, श्याम बडोदे, सुनील खोडे यांनी पालकांसह ट्रस्टी आणि मुख्याध्यापक यांच्याशी चर्चेने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रशासनाकडून अरेरावी करण्यात आली. दुपारी पुन्हा प्रभागाचे नगरसेवक, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरेंसह ट्रस्टी व मुख्याध्यापकांशी चर्चा करण्यास गेले असता त्यांनाही पुन्हा प्रशासनाकडून अरेरावी करण्यात आली. आमदार देवयानी फरांदे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये यांना तातडीने शाळेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी (दि. १०) सकाळपासून विद्यार्थी आणि पालकांची साक्ष घेण्यात आली. तसेच सुरक्षारक्षकांविरुद्ध असलेल्या तक्रारीनुसार पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासमोर तपासणी करण्यात आली. तसेच संबंधित तिघांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे. त्यांनी तपासासाठी सहकार्य न केल्यास त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.