शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

युवतीसोबत बळजबरी विवाह करून ठेवले डांबून

By admin | Updated: August 21, 2016 01:30 IST

युवतीसोबत बळजबरी विवाह करून ठेवले डांबून

नाशिक : भावास ठार मारण्याची धमकी देऊन २१ वर्षीय तरुणीचे मनमाड येथून अपहरण केल्यानंतर तिच्यासोबत बळजबरीने विवाह केल्याची घटना उघडकीस आली आहे़ विशेष म्हणजे या तरुणीसा गत तीन महिन्यांपासून घरामध्ये डांबून ठेवण्यात आले होते़ या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून मनमाड येथील संशयित रोहित संजय पवार (रा. रमाबाईनगर, मनमाड) सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, हा गुन्हा ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे़ मनमाडमधील जनार्दननगर परिसरातील पीडित तरुणीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित रोहित पवार याने १५ मे रोजी तोंड दाबून घरातून अपहरण केले़ यानंतर या तरुणीला नाशिकमध्ये आणून एका मंदिरात तिच्यासोबत बळजबरीने विवाह केला़ तसेच याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास वा सांगेल त्याप्रमाणे न वागल्यास तरुणीच्या भावाला जिवे ठार मारण्याची तसेच घर पेटवून देण्याची धमकी संशयित पवारने दिली होती़ यानंतर संशयित पवार याने या तरुणीस १७ मेपासून मनमाड येथील रमाबाईनगरमधील घरामध्ये डांबून ठेवले होते़ १९ आॅगस्टला येथून सुटका करून घेत या युवतीने सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो तत्काळ गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर तो मनमाड पोलिसांकडे वर्ग केला आहे. (प्रतिनिधी)