पंचवटी : हुंड्यातील रक्कम कमी दिल्याच्या कारणावरून पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी (दि़१२) मखमलाबाद रोडवरील वडजाईनगरमध्ये घडली होती़ या घटनेनंतर फरार झालेल्या पतीस पंचवटी पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील जाधववाडी येथून अटक केली आहे़मूळचा पुणे जिल्ह्यातील सर्जेराव हा विवाहानंतर पत्नीचा छळ करीत असल्याने गत चार-पाच महिन्यांपासून ती आई-वडिलांकडेच होती़ महिन्यापूर्वीच तो पत्नीला घेऊन आला होता़ पंचवटी पोलिसांनी मोबाइल टॉवरच्या सहाय्याने जाधववाडी येथून त्यास अटक केली़ (वार्ताहर)
खुनातील फरार पतीला अटक
By admin | Updated: July 13, 2015 23:56 IST