शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 23:48 IST

नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यक र्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनासाठी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनासाठी जागाच नसल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मोर्चा वळवला. मात्र यावेळी उपोषणाच्या जागेवरून प्रशासन आणि आंदोलकांमध्ये वादंग झाल्याने आंदोलकांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांना रोखल्यामुळे काही ...

ठळक मुद्दे परवानगी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमकआंदोलकांना रोखले :

नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यक र्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनासाठी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनासाठी जागाच नसल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मोर्चा वळवला. मात्र यावेळी उपोषणाच्या जागेवरून प्रशासन आणि आंदोलकांमध्ये वादंग झाल्याने आंदोलकांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांना रोखल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परंतु, पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून काही वेळासाठी न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ उपोषणास परवानगी दिली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या दुसºया टप्प्यात गुरुवार (दि. २६) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली. मात्र आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी जागेअभावी परवानगी नाकारली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरच रोखत आंदोलनासाठी परवानगी नसल्याचे सांगितले. पोलिसांच्या या विधानानंतर कार्यकर्त्यांनी थेट न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या आंदोलन करीत घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.  शुक्रवारपासून ईदगाह मैदानावर उपोषण करण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला. मात्र आंदोलनकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील जागेसाठी ठाम राहत तेथेच आंदोलन सुरू केले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर, राजू देसले, तुषार जगताप, अर्जुन खर्जुल, पूजा धुमाळ, डॉ. अनुपमा मराठे, चारुशिला देशमुख, मंगला शिंदे, वैशाली डुंबरे, संगीता खालकर, अस्मिता देशमाने, रोहिणी दळवी, शोभा सोनवणे, अनुपमा पाटील, मनोरमा पाटील, माधवी पाटील यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व कार्यकर्ते उपस्थित होते.अखेर परवानगीप्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी आंदोलनस्थळी येत पदाधिकाºयांशी चर्चा केली. उपोषणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या परिसरात जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्याचे काम सुरू असल्याने तसेच परिसरात शाळा, महाविद्यालये असल्याने उपोषणकर्त्यांना या जागेवर परवानगी नाकारत आंदोलकांची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी एक दिवसासाठी शिवाजी स्टेडियम परिसरात उपोषण करण्यास परवानगी दिली.