त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळा सन २०१५-१६ च्या पार्श्वभूमीवर करावयाच्या विकास कामांमध्ये सुमारे १४ कोटीपर्यंतची रस्त्याची कामे केवळ ‘वर्कआॅर्डर’ वेळेवर न दिल्याने नंतर लागलेल्या आचारसंहितेच्या बडस्यात अडकली आहेत. वास्तविक निविदा मंजूर झाल्या एजन्सीज निश्चित आल्या तथापि पालिकेच्या हलगर्जीपणामुळे आदेश देणे लांबले. वास्तविक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी वारंवार इशारा दिला. आचार संहितेच्या आत आॅर्डर्सच्या कामे चालु करा. पण आदेश दिले गेले नाहीत आणि प्रत्यक्ष कामे थांबली. त्र्यंबकेश्वर सिंहस्थ केवळ १० महिन्यांवर येऊन ठेपला आहे. तथापि सर्व कामांची डेडलाइन सर्व यंत्रणांना ३१ मार्च २०१५ दिला आहे. येथे मात्र प्रत्यंक कामांबाबत सर्वत्र सामसुम दिसत आहे. तर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाची कामे मात्र सुरु आहेत. मेळा अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, सहा. मेळा अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उदय किसवे या तीन अधिकाऱ्यांनी काल त्र्यंबकला भेट देवुन निलपर्वत जुना अखाड्याचे महंत हीरगिरी महाराज यांची भेट घेतली.तेथील रस्त्याची समस्या समजावुन घेत या कामाची पाहणीही केली. तेथून ते पिंपळद येथे जाऊन त्याच अखाड्याच्या जागेची व आश्रमाची पहाणी केली. तेथील मुख्य रस्त्यापासून अखाड्यापर्यंतच्या रस्त्याचीही पिंपळदला पाहणी केली. दरम्यान नव्यानेच पदभार स्वीकारलेल्या मुख्य मेळा अधिकारी रघुनाथा गावडे यांनी अन्य अखाड्यांमध्ये येऊन भेटी घ्याव्यात जेणेकरून भेटी ओळख होईल अशा अपेक्षा स्थानिक महंतांनी व्यक्त केल्या.
आचार संहितेत अडकली कामे
By admin | Updated: October 3, 2014 00:41 IST