शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धडक कारवाई : माजी नगरसेवक-अधिकारी यांच्यात शाब्दिक वाद त्रिमूर्तीतील अतिक्रमणांवर घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 01:48 IST

सिडको : महापालिकेच्या वतीने सिडको भागातील रहदारीस अडथळा ठरणारे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले.

ठळक मुद्देअतिक्रमण काढताना माजी नगरसेवक व अधिकारी यांच्यात शाब्दिक वादअ‍ॅडलॅब परिसरातून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात

सिडको : महापालिकेच्या वतीने सिडको भागातील रहदारीस अडथळा ठरणारे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची धडक मोहीम सुरू असून, गुरुवारी दिव्या अ‍ॅडलॅब, दुर्गानगर, फे्रशअप बेकरीसमोरील तसेच उत्तमनगर ते विजयनगर रस्त्यासह सुमारे दोनशेहून अधिक व्यावसायिकांचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. अतिक्रमण काढताना माजी नगरसेवक व अधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाला. या अतिक्रमण निमूर्लन मोहिमेमुळे मुख्य रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. महापालिकेच्या वतीने विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून सिडको भागातील मुख्य चौक व रस्त्यांचे अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. सुरुवातील मनपाने त्रिमूर्ती चौक येथील मुख्य रस्त्याला अडथळे ठरणारी अतिक्रमणे काढली. यानंतर पवननगर ते उत्तमनगर या भागातील मुख्य रस्त्यावरील दुकानदारांनी केलेले अतिक्रमण हटविले. गुरुवारी मनपाने दिव्या अ‍ॅडलॅब परिसरातून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. यावेळी माजी नगरसेवक पुंजाराम गामणे यांच्या दुकानापर्यंत पथक आल्यानंतर गामणे यांनी सदरचे दुकान हे सिडको प्रशासनाकडून विकत घेतले असून, कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केले नसल्याचा दावा केला. मात्र यानंतर याठिकाणी दाखल झालेले सिडकोचे प्रशासक अनिल झोपे यांनी सदरच्या दुकानाबाहेरील अतिक्रमण करण्यात आलेली जागा ही सार्वजनिक असल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर मनपाने याठिकाणचे अतिक्रमण हटविले. यावेळी मनपा अधिकारी व माजी नगरसेवक पुंजाराम गामणे यांच्यात शाब्दिक वाद झाला. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने वाद मिटला व लगेचच येथील अतिक्रमण हटविण्यात आले. यानंतर मनपाने आपला मोर्चा दुर्गानगर फ्रेशअप बेकरीसमोरील दुकानांकडे वळविला. यावेळी येथील मुख्य रस्त्याला अडथळा ठरणाºया पंचवीसहून अधिक व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविले. यानंतर दुपारी ही मोहीम उत्तमनगर ते विजयनगर या भागात राबविण्यात आली. गेल्या अनके वर्षांपासून असलेले अतिक्रमण मनपाने काढल्यानंतर रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मनपाच्या वतीने अतिक्रमण काढण्यास सुरुवात करताच परिसरातील अन्य दुकानदार स्वत:हून आपले अतिक्रमण हटवित असल्याचे दिसून आले. यावेळी अतिक्रमण काढताना बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी मनपाने दोनशेहून अधिक दुकानदारांनी केलेले अतिक्रमित पत्र्याचे शेड, ओटे तसेच जाहिरात फलक, बॅनर, दुकानाचे बोर्ड व काही ठिकाणचे पक्के बांधकाम काढण्यात आले. मनपाच्या विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत, सहायक अधीक्षक अंकुश आंबेकर, अतिक्रमण सिडको विभागाचे प्रमुख जीवन ठाकरे आदींच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जेसीबीयंत्र, दोन अतिक्रमण पथक, दोन टॅक्टर व सुमारे पन्नासहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.