शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कळवण शहरात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:14 IST

कळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या जिल्हा प्रशासनाने प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ...

कळवण :

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या जिल्हा प्रशासनाने प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरातील व तालुक्यातील व्यापारी व व्यावसायिक बांधवानी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्व दुकाने बंद ठेवली. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली.

शहरात सर्वत्र सामसूम दिसून आल्यामुळे प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला असला तरी व्यापारी बांधवाची बंदच्या निर्णयावर नाराजी आहे.

दरम्यान शहरात आजमितीस ३५ कोरोनाबाधित रुग्णाचा शासकीय आकडा असून खासगी औषधोपचार करून घरात क्वॉरंटाईन असणाऱ्या बाधितांचा आकडा अधिक आहे. शहरात विनामास्क फिरणाऱ्यांना व व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर पोलीस व नगरपंचायत प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शनिवार व रविवार बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, मनुष्य व प्राणीमात्रासाठी जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे किराणा, दूध व वृत्तपत्रे वितरण मात्र सुरू होते तरी त्या व्यावसायिकांना बंदचा परिणाम जाणवला.

कळवण शहरात व तालुक्यात आजमितीस ७८ रुग्ण असून खासगी दवाखान्यात औषधोपचार घेऊन घरात होम क्वॉरंटाईन असलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे जनता चांगलीच हादरली आहे. शनिवारी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला मेनरोड, सुभाष पेठ,शिवाजीनगर, गणेशनगर, बसस्थानक, जुना ओतूर रोड, गांधी चौक, अंबिका चौक, फुलाबाई चौक, नेहरू चौक, ओतूररोड, परिसरात आज सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. कळवणकरानी घरात राहणे पसंत केल्यामुळे रस्त्यावर नीरव शांतता होती शिवाय अभोणा व कनाशी गावामध्ये शांतता दिसून आली.

----------------

रस्त्यांवर शुकशुकाट

जीवनावश्‍यक वस्तू मेडिकल दुकान वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यामुळे कळवण शहरात व्यापारी व व्यावसायिक यांनी उत्स्फूर्तपणे आपली दुकाने बंद ठेवली त्यामुळे शहरातील रस्त्यांवर नीरव शांतता दिसून आली. कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी कळवणकरानी कंबर कसल्याचे दिसून आले.

मास्कशिवाय वावर,पोलीस नगरपंचायतकडून दंड - कोरोनाचे संकट वाढत असताना एकीकडे प्रशासनाकडून जिल्हाभरात कडक कोरोना प्रतिबंधात्मक नियम लागू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवर अनेक दुचाकी चालकांनी हेल्मेट अथवा मास्कचा वापर करीत नसल्याचे चित्र पाहायला मिळते या पार्श्वभूमीवर गेल्या शुक्रवारी शहरात पोलीस प्रशासन व नगरपंचायत प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. विनामास्क व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिक व भाजीपाला विक्रेते यांना दंड आकारण्यात येऊन दंडात्मक कारवाई केली. (२० कळवण १/२)

===Photopath===

200321\20nsk_1_20032021_13.jpg

===Caption===

२० कळवण१/२