शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रहदारीस अडथळे निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कडक कारवाई

By admin | Updated: September 2, 2014 01:14 IST

रहदारीस अडथळे निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कडक कारवाई

नांदगाव : रस्त्यांवर बसून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध आज मुख्याधिकारी निर्मला गायकवाड व पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी कणखर भूमिका कायम ठेवून लागोपाठ तिसऱ्या दिवशी रस्ता मोकळा ठेवल्याने नागरिकांनी प्रशासनास धन्यवाद दिले आहेत.फळ व भाजी विक्री करणे हे उदरनिर्वाहाचे साधन असल्याने आपणास सद्यस्थितीत आहे त्याच ठिकाणी थोडे मागे सरकवून रस्त्यावरच बसू द्यावे, अशी विक्रेत्यांनी मागणी केली. मात्र यापूर्वी अशाचप्रकारे प्रशासनाने सवलत दिली होती. परंतु थोड्याच दिवसात विक्रेत्यांनी ती धाब्यावर बसवून संपूर्ण रस्ता पुन: व्यापून टाकल्याचा इतिहास असल्याने यावेळी तसे होऊ नये म्हणून प्रशासनाने सदर मागणी फेटाळून लावली. वर्षानुवर्षे सदर व्यवसाय करत असल्याने त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी व रस्ता मोकळाच ठेवावा, अशी सूचना नगराध्यक्ष रामनिवास कळंत्री, नगरसेवक शिवाजी पाटील, बाळासाहेब कवडे, अरुण पाटील, विलास राजोळे व विश्वास आहिरे यांनी केली. विक्रेत्यांच्या वतीने सुनील जाधव यांनी ती मान्य केली. सकृतदर्शनी सदर जागा योग्य असल्याचे उपस्थितानी मान्य केल्यानंतर प्रशासनाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे. मात्र काही तांत्रिक व कायदेशीर बाबींची पडताळणी केल्यानंतर येत्या आठ दिवसांत दीर्घकालीन विचार करून सकारात्मक पावले उचलली जातील व पर्यायी व्यवस्था आकाराला येईपर्यंत विक्रेत्यांचा विचार करू, असे मुख्याधिकारी गायकवाड यांनी सांगितले. तीन दिवसांपूर्वी पोलीस उपअधीक्षक नरेश मेघराजानी यांनी अडथळे हटविण्याच्या कारवाईची सुरुवात केली होती. (वार्ताहर)