शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर शहरात कडकडीत लॉकडाऊन सुुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:59 IST

सिन्नर : शहर व तालुक्यात बुधवारी ११ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. यात सिन्नर शहरातील चार, बारागावपिंप्री येथील चार, मानोरी येथील दोन तर सुळेवाडी येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.

सिन्नर : शहर व तालुक्यात बुधवारी ११ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. यात सिन्नर शहरातील चार, बारागावपिंप्री येथील चार, मानोरी येथील दोन तर सुळेवाडी येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.तालुक्यात या ११ रुग्णांची भर पडल्यानंतर तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या ४१३ झाली आहे. आतापर्यंत सिन्नर ग्रामीण रुग्णालय व इंडिया बुल्स येथील कोविड रुग्णालयातून ३०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या १०१ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून, २१ रुग्णांचे अहवाल येण्याची प्रतीक्षा असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तालुक्यात रुग्णसंख्या चारशे पार झाल्यानंतर प्रशासन व व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन १४ दिवस सिन्नर शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची आज, बुधवारपासून अंमलबजावणी सुरू झाली. शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.दवाखाने व औषध दुकाने सुरू होती. सिन्नर शहरात १४ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन केल्यानंतर शहरातील रस्ते निर्जन झाले होते. तहसीलदार राहुल कोताडे, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, सहाय्यक निरीक्षक राजेंद्र रसेडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांच्यासह पोलीस कर्मचारी व नगर परिषद कर्मचारी शहरातील रस्त्यांवर उतरले होते. शहराच्या तीन किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्याने सिन्नर शहराच्या आत येणाºया प्रमुख चार रस्त्यांवर चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. सर्व प्रवाशांची सखोल माहिती घेतली जात होती.-----------------मेडिकल सकाळी १० ते ४ उघडे राहणारसिन्नर शहरातील मेडिकल असोसिएशनने सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मेडिकल उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला असून, शहरातील सर्व दवाखाने हे २४ तास सेवा पुरवत आहेत. दवाखान्यातील मेडिकल सेवादेखील चोवीस तास उपलब्ध आहे. तसेच मेडिकल असोसिएशनने आपत्कालीन वेळेत मेडिकल सेवा दिली जाईल, असेही जाहीर केले आहे.१२ हजार ५०० रुपये दंड वसूलअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली रस्त्यावर विनामास्क फिरताना आढळून आलेल्या नागरिकांकडून प्रतिव्यक्ती २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. दुचाकीवर डबल सिट, चारचाकी गाडीमध्ये तीनपेक्षा जास्त प्रवासी आढळून आल्यास अशांनाही दंड आकारण्यात आला आहे. अशा प्रकारची कार्यवाही करत जवळपास १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.

टॅग्स :Nashikनाशिक