शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर ठिय्या : कचराकुंडीभोवती वावर; भरवस्तीत मस्तवाल वळूंची झुंज

By admin | Updated: August 20, 2014 00:40 IST

मनमाड शहरात मोकाट जनावरांचा उच्छाद

गिरीश जोशी ल्ल मनमाडमनमाड शहरात मोकाट जनावरांचा उच्छाद वाढल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. भरवस्तीत तासन्तास चालणाऱ्या मोकाट जनावरांच्या झुंजीमुळे नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. शहराच्या कुठल्या ना कुठल्या भागात वारंवार जनावरांच्या झुंजी सुरू असल्याचे आता नित्याचे झाले आहे.गेल्या आठवड्यात मध्यवस्तीत रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन मस्तवाल वळूंच्या बेधुंद झुंजीने नागरिकांची एकच धावपळ उडाली, तर मार्गावरील रहदारीस काही वेळ अडथळा निर्माण झाला होता. ऐन दुपारच्या वेळी दोन मस्तवाल वळूंची झुंज सुरू झाली. थोड्याच वेळात रस्त्याच्या मधोमध जागेचा या वळूंनी कब्जा घेतला. या रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या नागरिकांनी ही झुंज सोडवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र बेधुंद वळूंवर कुठलाही परिणाम होत नव्हता. भर बाजारपेठेत गजबजलेल्या ठिकाणी वळूंच्या झुंजीमुळे नागरिकांची एकच पळापळ सुरू झाली. अखेर काही कालावधीनंतर दोन्ही वळू शांत झाल्यानंतर झुंज सुटली व नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.शहरातून जाणाऱ्या महामार्गावर मोकाट जनावरांचे वास्तव्य असल्याने नेहमीच रहदारीला अडथळा होत असतो, तर पादचाऱ्यांना उपद्रव सहन करावा लागतो. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.