सिडको : शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय त्वरित जाहीर करावा यासाठी सोमवारी सकाळी पाथर्डीफाटा येथे सकल मराठा समाज, छत्रपती सेना, मराठा सोशल फाउंडेशन यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात समाजबांधवांनी टाळ-मृदुंग वाजवित भजन करून शासनाचा निषेध केला मुख्यमंत्र्यांना आरक्षणासाठी सदबुद्धी देवो यासाठी विठोबाला साकडे घालण्यात आले. या आंदोलनात छत्रपती सेनेचे चेतन शेलार, नीलेश शेलार, तुषार गवळी, राजेश पवार, संदीप निगळ, विशाल पाटील, राहुल पाटील, शैलेश कारले पाटील, धीरज खोळंबे , अनिल आदमाणे, सागर धोंगडे, करण पाटील, चंद्रकात बनकर , मराठा सोशल फाउंडेशनचे सोमनाथ बोराडे, खंडू दातीर, साहेबराव दातीर, शशीकांत दातीर, अमित जाधव, संतोष गायधनी, स्वप्नील इंगळे, महेश देवरे, महेश दातीरआदी सहभागी झाले होते.
पाथर्डीफाटा येथे ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:09 IST