शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ताण-तणावामुळे तरुणांना बसतोय हृदयरोगाचा ‘झटका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 00:10 IST

काळानुरूप सर्वच क्षेत्रात वाढती स्पर्धा अन् त्यामधून निर्माण होणारा ताणतणाव तरुणाईला विविध व्यसनांकडे घेऊन जात आहे. परिणामी तरुणाई व्यसनाधीन होऊन निकृष्ट आहाराला पसंती देऊ लागली आहे. त्याचा थेट परिणाम तरुण हृदयावरही होऊ लागल्याचे मत शहरातील हृदयरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले.

नाशिक : काळानुरूप सर्वच क्षेत्रात वाढती स्पर्धा अन् त्यामधून निर्माण होणारा ताणतणाव तरुणाईला विविध व्यसनांकडे घेऊन जात आहे. परिणामी तरुणाई व्यसनाधीन होऊन निकृष्ट आहाराला पसंती देऊ लागली आहे. त्याचा थेट परिणाम तरुण हृदयावरही होऊ लागल्याचे मत शहरातील हृदयरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले.बदलती जीवनशैली, कामाचा तणाव तसेच विविध व्यसनांमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराची समस्या वाढीस लागत आहे. वाढत्या वयासोबत रक्तात चरबीचे प्रमाण वाढून रक्त गोठणे ही बाब नैसर्गिक आहे. मानसिक ताणतणाव, बैठी जीवनशैली व निष्कृष्ट आहारशैलीमुळे तरुणाईच्या रक्तात ‘कोलेस्ट्रॉल’ वाढत असून, ऐन तारुण्यात हृदयाला धक्का बसत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविली आहे. हृदयरोग म्हटला की पूर्वी वयाची साठी असलेली व्यक्ती डोळ्यापुढे येत होती, मात्र मागील दहा वर्षांमध्ये ही परिस्थिती बदलली असून, या जीवघेण्या आजाराचा वयोगट झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. हृदयरोगावर तज्ज्ञांनीही याबाबत आश्चर्य व्यक्तकेले आहे. वयाच्या विशी-तिशीमध्येच हृदयविकाराचा झटका नागरिकांना येत असल्याचे चित्र शहरासह जिल्ह्यातही पहावयास मिळत आहे. तरुण पिढीतील वाढती स्पर्धा, लालसा आणि असमाधानी वृत्तीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसते, यामुळे ताणतणावाचा सामना क रावा लागतो, परिणामी व्यसनाधीनता, निकृष्ट आहाराला प्राधान्य अशा सवयी तरुणाईला जडल्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या सवयींचा दुष्परिणाम थेट त्यांच्या हृदयालाच बंद करण्यापर्यंत जाऊन पोहचला असून, ही बाब अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे.व्यसन व ताणतणावच हृदयविकारास कारणीभूतहृदयविकाराचा आजार हा सद्यस्थितीत ज्येष्ठांमध्ये नसून तरुणांमध्येच याचे वाढते प्रमाण दिसून आल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असून, यासाठी विविध प्रकारचे व्यसन व कामाचा ताणतणाव या कारणांमुळेच या आजाराला तरुण बळी पडत आहे. व्यसनांमध्ये तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारू इत्यादी व्यसनांमुळे हृदयविकार बळावत आहे. तसेच असमाधानी जीवनामुळे जास्त प्रमाणात ताणतणाव निर्माण होतो. त्यामुळे याचा परिणाम थेट हृदयावरच होत असल्यामुळे या आजाराचे प्रमाण सध्याच्या जीवनात वाढत आहे.तारुण्यात हृदयविकाराचा झटका येणे यासाठी आपली बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, व्यसन यामुळे हा आजार तरुणांना बळावत आहे. यामुळे तरुणांनी तणावमुक्त जीवन जगावे तसेच पुरेशी झोप, व्यायाम, उत्तम दर्जाचे अन्न घेतल्यास या आजारापासून सुटका मिळवू शकतो.-डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, हृदयरोगविकार तज्ज्ञकामाच्या ताण तणावामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येतो.तरुणांमध्ये वाढते व्यसन यामुळेही या आजाराला आमंत्रण मिळते. -डॉ. मनोज चोपडा,हृदयरोगविकार तज्ज्ञआता ३० ते ४० वयोगटांतील तरुणांमध्ये याचे प्रमाण वाढत असल्याचे काही वर्षांत दिसून येत आहे. फास्ट लाइफ, व्यसने, व्यायामाचा अभाव या क ारणांमुळेच हा आजार तरुणांमध्ये जडत आहे.-डॉ. राहुल कैचे,हृदयरोगविकार तज्ज्ञ

 

 

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल