शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

मलनिस्सारण केंद्राचा भूखंड बीओटीवर विकसनाचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 18:44 IST

नाशिक : प्रभाग क्रमांक २५ मध्ये बंद स्थितीत असलेल्या मलनिस्सारण केंद्राचा सुमारे चार एकराहून अधिक भूखंड बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप प्रभागातील सेनेचे नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे. सदर भूखंड बीओटीवर दिल्यास पेलिकन पार्कसारखी पुनरावृत्ती होण्याची भीतीही साबळे यांनी व्यक्त केली आहे.साबळे ...

नाशिक : प्रभाग क्रमांक २५ मध्ये बंद स्थितीत असलेल्या मलनिस्सारण केंद्राचा सुमारे चार एकराहून अधिक भूखंड बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप प्रभागातील सेनेचे नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे. सदर भूखंड बीओटीवर दिल्यास पेलिकन पार्कसारखी पुनरावृत्ती होण्याची भीतीही साबळे यांनी व्यक्त केली आहे.साबळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, बंद असलेल्या चार एकरहून अधिक भूखंडाची आजच्या बाजारभावाने सुमारे ३० ते ३५ कोटी रुपये किंमत आहे. चालू अंदाजपत्रकात सदर भूखंड बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जात आहे. सदर प्रभागात कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. त्यामुळे या समाजाच्या गरजा पुरवणाºया सोयी-सुविधा या भूखंडावर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिकेची गरज आहे. नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी अद्ययावत नाट्यगृहाची आवश्यकता आहे. ज्येष्ठ नागरिक धार्मिक केंद्र, निसर्गोपचार केंद्र, विरंगुळा असलेल्या केंद्राच्या प्रतीक्षेत आहेत. नागरिकांच्या अपेक्षा विचारात न घेता प्रशासनाकडून मात्र सदर भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी सिडकोतील पेलिकन पार्कची झालेली अवस्था नजरेसमोर असतानाही प्रशासनाकडून धाडस केले जात आहे. सदर भूखंड बीओटीवर न देता तो मनपानेच विकसित करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आलेली आहे.