शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कथा बैठकांची, कोटींच्या थैलीची..!

By admin | Updated: June 20, 2017 01:26 IST

व्यावसायिकांच्या निधी संकलनाने चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोणाचा हीरक, अमृतमहोत्सव असला किंवा विशेष काही प्रसंग तर अशावेळी शुभेच्छांबरोबर थैली देण्याची प्रथा आहे. कोणी अशा थैलीला गौरव निधीही म्हणतात. अलीकडील काळात अशी थैली जमा करण्याचा प्रसंग काही घडला नाही, परंतु सध्या मात्र काही व्यावसायिक थैली देण्यासाठी वारंवार बैठका घेत असून, त्यामुळे काही कोटी रुपयांची थैली जमा करण्याची चर्चा मात्र सर्वत्र रंगली आहे.परंपरेने कधी कोणाला काय द्यावे हे ठरवून दिले असले तरी आता थैली संस्कृतीची ‘परंपरा’च पडली आहे. कोणाकडून काही काम करायचे म्हटले की, थैली देणे अटळच मानले जाते आणि त्यात देणाऱ्या आणि घेणाऱ्याला वावगे काहीच वाटत नाही. सध्या ज्या थैलीची चर्चा सुरू आहे, तिचे मोल मात्र काही अधिक प्रमाणात आहे. कारण ही थैली साधीसुधी नसून कोटी रुपयांची असल्याचे बोलले जात आहे. सध्या (अ)न्यायग्रस्त आणि त्यातून उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या एका विशिष्ट व्यावसायिक गटाकडून वारंवार बैठका घेतल्या जात असून, त्या थैलीसाठी निधी संकलन हेच एकमेव कारण दिले जात आहे. बरेतर निधी संकलनासाठी बैठका घ्याव्यात इतके आर्थिक दुर्बल हे व्यावसायिक नाहीत. म्हटले तर कोटींच्या थैलीचा भार त्यांच्यापैकी एकजणही पेलू शकतो. एरव्ही कायद्याचे पालनकर्त्या प्रत्येकाच्या अवेतनीय आमदानीत हे सारेच व्यक्तिगत पातळीवर घालत असतात. भरीस भर अनेक गल्लीदादा, भाऊ आणि सामाजिक कार्यकर्ते याच व्यावसायिकांच्या जिवावर रोजगारही मिळवत असतात. परंतु आता कोणाची दृष्ट लागली कोणास ठावूक, त्यांचा व्यवसायच धोक्यात आला. बरे जिथे जाऊ तेथे विरोध..मग, काय करायचे? आई जेऊ देईना, बाप भीक मागू देईना प्रमाणेच मायबाप सरकार मरू देईना आणि जगायचे तर कसे... बहुधा याच उद्देशाने सध्या ग्रासलेल्या मंडळींच्या ठिकठिकाणी बैठका होतात. थैलीतील निधी संकलनाला ‘बार’ (म्हणजे ‘मर्यादा’ बरं का) नाही मात्र बैठकींसाठी बहुतांशी ‘बार’चाच आधार. विषय एकच थैलीसाठी निधी संकलन... बैठका घेऊन होणारे थैली संकलन कोणासाठी याचे उत्तर मात्र त्यांच्या पुरतेच मर्यादित असले तरी बाहेर मात्र त्याविषयी चर्चा रंगली आहे.