शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्याने १३५ वृक्ष कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:36 IST

नाशिक : मुंबईकडून ‘निसर्ग’ चक्र ीवादळाने बुधवारी (दि.३) संध्याकाळी आता उत्तर महाराष्ट्राकडे आगेकूच करताच त्याचा प्रभाव अत्यंत तीव्र स्वरूपात रात्री उशिरापर्यंत नाशिक शहरासह जिल्ह्यात जाणवला. वारे ताशी ५० ते ६० किमी इतक्या वेगाने वाहू लागल्याने शहरातील विविध उपनगरांमध्ये सुमारे १३५ लहान-मोठे वृक्ष कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्यालयाने दिली.

नाशिक : मुंबईकडून ‘निसर्ग’ चक्र ीवादळाने बुधवारी (दि.३) संध्याकाळी आता उत्तर महाराष्ट्राकडे आगेकूच करताच त्याचा प्रभाव अत्यंत तीव्र स्वरूपात रात्री उशिरापर्यंत नाशिक शहरासह जिल्ह्यात जाणवला. वारे ताशी ५० ते ६० किमी इतक्या वेगाने वाहू लागल्याने शहरातील विविध उपनगरांमध्ये सुमारे १३५ लहान-मोठे वृक्ष कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्यालयाने दिली. संध्याकाळी ७ वाजेपासून आतापर्यंत नाशिक अग्निशमन दलाच्या मुख्यालयासह पाच उपकेंद्रांचे जवान बंबासह विविध भागांमध्ये दाखल होऊन रस्त्यांवर कोसळलेल्या झाडांच्या फांद्या कापून अडथळा दूर करण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. ठाणे जिल्ह्यामार्गे हे वादळ उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने रात्री झेपावले. वादळाचा तडाखा प्रत्यक्षरित्या नाशिक जिल्ह्याला बसला नसला तरी त्याच्या प्रभावाने मात्र जिल्ह्यात हाहाकार माजविला.शहरात वादळी वाºयासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. मध्यरात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. सुमारे शंभर मिमीपेक्षा अधिक पाऊस रात्री साडेआठ वाजेपासून पुढे पहाटेपर्यंत पडल्याची नोंद झाली. यावरून वादळी पावसाची तीव्रता सहज लक्षात येते. वारे ताशी ५० ते ६० किमी इतक्या वेगाने वाहू लागल्यामुळे शहरात ठिकठिकाणी वृक्ष कोसळले. गडकरी चौकातील आयकर भवनामध्ये असलेला अत्यंत जुना महाकाय वटवृक्षदेखील उन्मळून पडला.संध्याकाळी वेगावे वाहणाºया वाऱ्यांमुळे झाडे एखाद्या झोक्यासारखे हलू लागले होते. झाडांच्या फांद्या थेट जमिनीला भिडू लागल्या होत्या. सायंकाळी ७ वाजेपासून शहरातील विविध उपनगरांमध्ये झाडे कोसळण्याच्या घटना सुरू झाल्या आणि अग्निशमन दलाच्या मुख्यालयासह विविध उपकेंद्राचेदूरध्वनी खणखणू लागले. सावरकरनगर, महात्मानगर, गंगापूररोड, नाशिकरोड, सिडको, पंचवटी, सातपूर, मध्य नाशिक, अंबड अशा विविध उपनगरांमध्ये वृक्ष कोसळळ्याची माहिती मिळाली.------------------------इंदिरानगरात दोन वृक्ष पडलेइंदिरानगर : मुसळधार पाऊस व वाºयामुळे दोन मोठी वृक्ष उन्मळून पडले. पाटील गार्डनमध्ये गुलमोहर व शिवाजीनगर येथे कडुलिंबाचे वृक्ष उन्मळून पडले, तर श्रीराजसारथी सोसायटी, बापू बंगलालगत भाभानगर, सहकारनगर, पूर्णिमा आदी ठिकाणी वृक्षाच्या फांद्या तुटल्याची घटना घडली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक