शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

नांदगावी समर्थकांचा रास्ता रोको

By admin | Updated: August 18, 2016 23:34 IST

आरोप : छगन भुजबळांसह कुटुंबीयांना संपविण्याचे षडयंत्र

नांदगाव : न्यायालयात कोणताही गुन्हा अजून सिद्ध झाला नसताना छगन भुजबळ व कुटुंबीयांना संपविण्यासाठी सगळे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप करीत भुजबळ समर्थकांनी आज येथे सरकारच्या विरोधात रास्ता रोको केला.माळी समाजापुरता हा मेळावा असू नये. भुजबळ सर्वांचेच अशी भूमिका काही समर्थकांनी व्यक्त केल्याने व्यासपीठावर कुणीही बसणार नाही. मंचावर लावलेल्या ध्वनिक्षेपकासमोर जायचे व विचार मांडायचे अशा मतप्रवाह दिसून आल्याने या मेळाव्यात तरु णांनी मोठी उपस्थिती लावली. छगन भुजबळ पंकज भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा केलेला विकास लक्षात घेता या मतदारसंघातून भुजबळ यांच्याप्रति विश्वास दाखविणारा मेळावा म्हणूनदेखील त्याकडे बघितले. माजी आमदार अनिल अहेर, नाशिकचे डॉक्टर कैलास कमोद, साहेबराव पाटील, नगराध्यक्ष शैलेजा गायकवाड, डॉ.वाय.पी. जाधव, धनंजय कमोदकर, माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, भास्कर कदम, देवदत्त सोनवणे, यशवंत शिंदे, विजय पाटील, साहेबराव अहेर, शिवाजी पाटील, रमेश पगार, डॉक्टर सुरेश गायकवाड, इक्बाल शेख, सचिन मराठे, महेंद्र गायकवाड, राजेंद्र गायकवाड, बाळा गायकवाड आदिंच्या उपस्थितीत निषेध मेळाव्यात जोरकस निषेध व्यक्त केला. विष्णू निकम यांनी सूत्रसंचालन केले़या मेळाव्याच्या सांगतेनंतर शहराच्या विविध मार्गाने मेळाव्याला उपस्थितीत हजारोच्या संख्येने भुजबळ समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करीत भव्य रॅली काढली. जुन्या तहसील कार्यालयाजवळील राज्य मार्गाच्या त्रिफुलीवर कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनावेळी सरकारचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आले. पोलीस निरीक्षक अरुण निकम यांना आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले़ (वार्ताहर)