शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पेठ येथे विरोधकांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:54 IST

तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने तसेच कर्जमाफीत शेतकºयांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करीत माकपाने राष्ट्रवादी, मनसे व कॉँग्रेसला सोबत घेत नाशिक -बलसाड रस्त्यावर पेठ चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. लेखी आश्वासनानंतर तब्बल दहा तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

पेठ : तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने तसेच कर्जमाफीत शेतकºयांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करीत माकपाने राष्ट्रवादी, मनसे व कॉँग्रेसला सोबत घेत नाशिक -बलसाड रस्त्यावर पेठ चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. लेखी आश्वासनानंतर तब्बल दहा तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.  माकपाचे आमदार जे. पी. गावित, राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी मागील आठवड्यात मोर्चा काढण्यात आला होता. मात्र शासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला होता. निराधार योजनेचा लाभ मिळावा, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, वनजमीनीचा प्रश्न मार्गी लागावा, घरकूल योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी करावी, नदी जोड प्रकल्प तात्काळ थांबवा, पर्यटन विकास करावा, भारनियमन रद्द करावे, शासकिय अधिकाºयांच्या कामकाजाची चौकशी करावी . आदी मागण्यांसाठी माकपा, किसानसभा, राष्ट्रवादी कॉग्रेस व मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांनी पेठ शहरातून मोर्चा काढत जूना बस स्टँडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉ. काशिनाथ भंडागे, मनसेचे तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत, जिल्हा किसान सभेचे सरचिटणीस सावळीराम पवार, कॉ. इंद्रजीत गावीत, अ‍ॅड. दत्तू पाडवी, कॉग्रेसचे भिका चौधरी, कॉ. सुनिल मालुसरे, आमदार नरहरी झीरवाळ, आ. जे.पी. गावीत आदींनी मोर्चेकºयांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष निवृत्ती महाले, माकपाचे तालुकाध्यक्ष कॉ.देवराम गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दामू राऊत, नामदेव मोहाडकर, नामदेव हलकंदर, जाकीर मनियार, गिरीश गावीत, सुरेश भिवसन यांच्यासह माकपा, राष्ट्रवादी, मनसे, कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान उपविभागीय अधिकारी उदय किसवे, तहसीलदार हरिष भामरे, गटविकास अधिकारी भालचंद्र बहिरम यांच्यासह सर्व शासकीय विभागप्रमुख उपस्थित होते.भर उन्हात कार्यकर्त्यांचा रस्त्यावर डेरा दुपारी २ वाजेपासून पेठच्या रस्त्यावर भर उन्हात कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते. कडक उन्हातही महिला कार्यकर्त्यांसह नागरीक बसून होते. दुपारी १ वाजेपासून सुरू झालेले आंदोलन ९ तासांपेक्षा अधिककाळ सुरू होते. दोन्ही आमदारांसह जवळपास तीन हजार सर्व पक्षीय कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मांडून होते वन जमिनीच्या प्रश्नावर तोडगा निघाला नसल्याने जो पर्यंत वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी येत नाही तो पर्यत माघार न घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिल्याने स्थानिक प्रशासनासमोर पेच निर्माण झाला. आंदोलनामुळे दोन्ही बाजूकडची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.