शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नांदगावी बॅँकेसमोर रास्ता रोको

By admin | Updated: November 19, 2015 22:17 IST

मनमानी : अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक

नांदगाव : स्टेट बँकेची सेवा विस्कळीत झाल्याचा निषेध करत पक्षीय कार्यकर्त्यांनी व ग्राहकांनी रास्ता रोको केला. मालेगाव रस्त्यावरील स्टेट बँकेसमोर अर्धा तास रोको केल्याने दुतर्फा वाहनांची रांग लागली होती. शाखाधिकारी आशुतोष भिडे यांच्याकडून ग्राहकांचा मान राखला जात नसल्याची मुख्य तक्रार आहे.आंदोलनकर्त्यांपुढे सुरेश शेळके, भाजपा तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ जगताप यांची भाषणे झाली. भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. जयश्री दोंड, माजी आमदार संजय पवार, जनशक्ती भ्रष्टाचार निवारण समितीचे वालचंद चोपडा यांनी रास्ता रोकोचे नेतृत्व केले. शाखाधिकारी म्हणून भिडे यांना विरोध नसला तरी त्यांच्या प्रवृत्तीला विरोध असल्याची टीका भाजपाचे दत्तराज छाजेड यांनी केली. बँकेत टोकन पद्धत नुकतीच सुरू झाली. या पद्धतीत पैसे मिळण्यास विलंब होत असल्याची तक्रार आहे. कर्ज प्रकरणांना विलंब, जनधन योजना, मुद्रा बँक योजना यात सेवा मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांना सन्मान दिला जात नाही. या तक्रारींसह शाखाधिकारी व कर्मचारी यांचेकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते. गरज नसल्यासारखी उत्तरे दिली जातात, असे तक्रारींचे स्वरूप आहे. (वार्ताहर)