चांदवड : कांद्याला प्रतिक्विंटल ७०० रुपये असा अल्पभाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. या यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सुमारे दोन तासांनंतर बाजार समितीतील व्यवहारही सुरळीत झाले.माजी आमदार शिरीष कोतवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, संजय जाधव, अॅड. नवनाथ अहेर, बाळासाहेब वाघ, आर. बी. वाघ, प्रवीण हेडा आदिंसह अनेक व शेतकरी उपस्थित होते. याबाबत शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावे, या प्रश्नावर केंद्र व राज्य सरकारला घटनेची माहिती पोहचू, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले तर शिरीष कोतवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी रास्ता रोको आंदोलनामुळे अनेक रुग्ण व प्रवासी यांना वेठीस धरू नये, असे आवाहन शेतकऱ्यांना केल्याने रास्ता रोको मागे घेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये सभा घेण्याचे ठरले.रास्ता रोकोनंतर लगेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये व्यापारी, शेतकरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, संचालक व माजी आमदार शिरीष कोतवाल, संजय जाधव, बाळासाहेब वाघ, सचिव आर.बी. वाघ, व्यापारी प्रवीण हेडा, पारस डुंगरवाल, सुशील पलोड, पप्पूशेठ हेडा, अविनाश व्यवहारे, अग्रवाल यांच्या उपस्थित अनेक समस्यांवर चर्चा झाली.यावेळी मात्र संतप्त शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या तर शेतकऱ्यांचा शेतीमाल फाळके पाडून बघू घेतल्यानंतरही व्यापारी वांदे काढतात यावर चर्चा झाली तर बाजारभावामध्ये इतर कृउबाच्या तुलनेत फरक पडतो, असा आरोप करण्यात आला.तर यावरून माजी आमदार कोतवाल व सभापती डॉ. कुंभार्डे यांच्यामध्ये भ्रमणध्वनीवर बाजारभाव टाकले जातात व त्यात इतर बाजार समितीच्या तुलनेत फरक असतो यावरून शाब्दिक चकमकही उडाली तर येत्या आठ दिवसात कांद्याला योग्य भाव न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार कोतवाल यांनी दिला तर सभापती डॉ.कुंभार्डे यांनी जिल्हाधिकारी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, केंद्रीय कृषिमंत्री, सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांना कांदा बाजारभावातील घसरण रोखण्यासाठी किमान निर्यातमूल्य कमी करण्याचे निवेदन दिले असल्याचे डॉ. कुंभार्डे यांनी सांगितले. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले. यावेळी असंख्य शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
चांदवडला कांदा उत्पादकांचा रास्ता रोको
By admin | Updated: December 4, 2015 21:42 IST