शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बोरगावी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:06 IST

बोरगाव/सुरगाणा : वीज भारनियमन कमी करावे तसेच सुरगाणा तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव युवा समिती व सर्वपक्षीय व शेतकरी बांधवांतर्फे वणी-सापुतारा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती.

ठळक मुद्देवणी-सापुतारा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

बोरगाव/सुरगाणा : वीज भारनियमन कमी करावे तसेच सुरगाणा तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव युवा समिती व सर्वपक्षीय व शेतकरी बांधवांतर्फे वणी-सापुतारा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती.आंदोलनात मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी विविध घोषणा देत वाहतूक अडवून धरली. महिलांनीही सहभाग नोंदवला. समितीच्या कार्यकर्त्यांनी विविध समस्या महावितरण कंपनीचे अधिकारी वाजे यांच्यासमोर मांडल्या. त्यांनी दोन दिवसांत समस्या सोडवू, असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात दादाराव पवार, काशीनाथ भोये, अशोक गवळी, नामदेवराव भोये, सुमन भोये, लक्ष्मण बागुल, भास्कर भोये, हेमंत चव्हाण व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक खरे, माने, गोतुर्णे, गांगुर्डे, गवळी यांनी बंदोबस्त ठेवला. परतीच्या पावसाने दडी मारल्याने पावसाच्या भरवशावरील शेतीतील ४० ते ५० टक्के पिके करपली आहेत. उर्वरित पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत असताना तालुक्यातील महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे, वाढते भारनियमनामुळे शेतकरी वैतागले आहेत.