नाशिक : गंगापूर धरणावरील पंपिंगस्टेशन येथे विविध कामांसाठी वीजपुरवठा बंद करण्यात येणार असल्याने मंगळवारी (दि.२४) संपूर्ण शहरात दुपारी आणि सायंकाळचा, तर बुधवारी (दि.२५) सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाने एका पत्रकान्वये कळविले आहे.गंगापूर धरणातील पंपिंगस्टेशन येथे नवीन एनर्जी मीटर बसविणे, सबस्टेशनविषयक कामे करणे, तसेच शहरातील पाणीपुरवठा वितरण वाहिन्यांच्या दुरुस्त्या करणे, गळती बंद करणे आदि विविध कामे करण्यासाठी महावितरणचा वीजपुरवठा खंडित करावा लागणार आहे. त्यामुळे मंगळवार, दि. २४ रोजी संपूर्ण शहराचा दुपारचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दि. २५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत, तर दुपारी व सायंकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने कमी प्रमाणात होणार असल्याचे अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)
शहरात आज पाणीपुरवठा बंद
By admin | Updated: November 23, 2015 23:42 IST