शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पर्वणीत शहर बस वाहतूक बंद

By admin | Updated: August 25, 2015 23:24 IST

बाहेरगावी जाण्यासाठी १२ ते १४ किलोमीटर अंतरावर बससेवा

नाशिक : कुंभमेळ्यातील पर्वणीच्या तीन दिवसांसाठी संपूर्ण नऊ दिवस सार्वजनिक आणि खासगी वाहतूक नियंत्रित करण्याचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसणार असून, या कालावधीत शहर बस वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याची गर्दी ज्या भागात नाही अशा सातपूर-सिडकोसह कॉलेजरोड मखमलाबाद, आडगाव येथे नागरिकांना प्रवास करणे शक्य होणार नसल्याने नागरिकांचे हाल होणार आहेत. इतकेच नव्हे तर ज्या नागरिकांना मुंबई-पुणे किंवा तत्सम बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी नागरिकांना दहा ते बारा काहींना तर वीस वीस किलोमीटर पायपीट करून बाह्य वाहनतळ गाठावे लागणार आहे. येत्या २९ आॅगस्ट, १३ सप्टेंबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सामायिक, तर १८ रोजी नाशिक आणि २५ सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे पर्वणी होणार आहे. या पर्वणी कालावधीत प्रशासनाने पर्वणीच्या आदल्या आणि दुसऱ्या दिवशीदेखील वाहतुकीवर नियंत्रणे ठेवून शहरात कोणतेही वाहन फिरणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. त्याच अंतर्गत नाशिक शहरात मध्यवर्ती भागात सार्वजनिक वा खासगी वाहने नसणे ठीक, परंतु प्रशासनाने परिवहन महामंडळाच्या शहर बस सेवादेखील बंद ठेवण्यास सांगितले आहेत. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी नाशिकला आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना बाह्य वाहनतळावरून अंतर्गत तसेच त्र्यंबकेश्वरकडे ब्रह्मा व्हॅली येथील अंतर्गत वाहनतळाकडे नेण्यापलीकडे परिवहन महामंडळाची बस सेवा नसणार आहे. इतकेच नव्हे तर ज्या भागात कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांचा संबंध नाही अशा गंगापूर गाव, शिवाजीनगर, सातपूर, सिडको, चुंचाळे, मखमलाबाद, म्हसरूळ, इंदिरानगर पाथर्डी या भागात जाण्यासाठी कोणतीही बस सेवा नसेल. परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक मिलिंद बंड यांनी त्यास दुजोरा दिला.त्यामुळे या भागात रिक्षाच्या अथवा स्वत:च्या खासगी वाहनांच्या भरवशावरच नागरिकांना राहावे लागणार आहे, परंतु याही पलीकडे जाऊन शहरातून कोणाला अत्यावश्यक म्हणून पुण्याला जायचे असेल तर त्यांना सिन्नर फाट्यापर्यंत पायी चालत जावे लागेल. मुंबई नाक्यावरून महामार्ग बसस्थानकातून विल्होेळी आणि तेथून मुंबई असे जावे लागेल. जिल्ह्यात मालेगाव, निफाड, दिंडोरी किंवा सिन्नर यामार्गावर किंवा तेथून पुढे जायचे असेल तर या मार्गाकडे जाणाऱ्या अंतर्गत वाहनतळावरून बाह्य आणि तेथून संबंधित गाव किंवा तालुक्याकडे जाणारी बस गाठावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)