शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:04 IST

सायखेडा : शिंपी टाकळी, दारणासांगवी, तळेगाव वाट, चितेगाव फाटा, वºहेदारणा, लालपाडी, चांदोरी शिवार या भागातून चांदोरी, सायखेडा येथे महाविद्यालयात येणाºया-जाणाºया शेकडो विद्यार्थ्यांची बसअभावी गैरसोय होत असल्याने चांदोरी येथील शिंपी टाकळी फाटा येथे संतप्त विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास रस्ता रोको केला. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जमावाला ...

सायखेडा : शिंपी टाकळी, दारणासांगवी, तळेगाव वाट, चितेगाव फाटा, वºहेदारणा, लालपाडी, चांदोरी शिवार या भागातून चांदोरी, सायखेडा येथे महाविद्यालयात येणाºया-जाणाºया शेकडो विद्यार्थ्यांची बसअभावी गैरसोय होत असल्याने चांदोरी येथील शिंपी टाकळी फाटा येथे संतप्त विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास रस्ता रोको केला. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे विद्यार्थी अधिकच संतप्त झाले.सायखेडा, चांदोरी या ठिकाणी असलेल्या शाळा, महाविद्यालयात जाणाºया-येणाºया विद्यार्थ्यांसाठी या मार्गावर बस थांबे असून, बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. अनेकवेळा विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष तसेच पालक यांनी निवेदन दिले आहे, मात्र फक्त आश्वासने मिळत असल्याने विद्यार्थी संतप्त झाले. महाविद्यालयाची वेळ सकाळी लवकर असून, बस थांबत नसल्याने उशीर होतो, पालक आपल्या मुलांना दररोज शाळेत सोडवू शकत नसल्याने अनेकदा घरी रहावे लागते. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी आणि ग्रामस्थाच्या वतीने शिंपी टाकळी फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. नाशिक तसेच येवला, लासलगावकडून येणºया बसेस थांबत नसल्याने महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून तसेच विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन बस फेºया वाढवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या ठिकाणी सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आंबदास मोरे, तहसीलदार विनोद भामरे यांनी भेट देत संबंधिताशी मोबाइलवरून संपर्क केला. तसेच बसफेºया वाढवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी चांदोरीचे तानाजी चारोस्कर, संदीप टर्ले, संदीप गडाख, संजय शिंदे, पुंडलिक टर्ले, संजय टर्ले, किरण गुंजाळ, नवनाथ नाठे, भगवान गोराडे, विजय शिंदे आदी विद्यार्थी, विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.