शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव येथे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:16 IST

सुरत-शिर्डी राज्य मार्गाचे दुपदरी महामार्गात रु पांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने सिमेंट काँक्रि टीकरण करण्यात येत आहे. मात्र हे काम संथ गतीने सुरू असून, या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांसह प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको करत आपला रोष व्यक्त केला. संबंधित प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत ठेकेदाराने तत्काळ काम मार्गी लावण्याची मागणी केली.

ठळक मुद्देसंताप : सुरत-शिर्डी महामार्गाचे काम संथ गतीने; धुळीचे साम्राज्याने आरोग्य धोक्यात

पिंपळगाव बसवंत : सुरत-शिर्डी राज्य मार्गाचे दुपदरी महामार्गात रु पांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने सिमेंट काँक्रि टीकरण करण्यात येत आहे. मात्र हे काम संथ गतीने सुरू असून, या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांसह प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको करत आपला रोष व्यक्त केला. संबंधित प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत ठेकेदाराने तत्काळ काम मार्गी लावण्याची मागणी केली.या रस्त्याच्या कामामुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडत आहे. दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना समोरून येणारे वाहन दिसत नाहीत. अनेकवेळा रस्त्यावर पाणी मारण्याची मागणी केली असता याकडे दुर्लक्ष केले जात आहे. धुळीचे साम्राज्य व कामामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.खड्ड्यांमुळे वाहनांचेही नुकसान होत आहे, या सर्व हानीला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांसह प्रवाशांनी उपस्थित केला आहे. दुसरी बाब म्हणजे रस्त्यावर ठिकठिकाणी मोऱ्या अथवा पुलाचे काम केले आहे. त्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. सुरत-शिर्डी राज्य मार्गाचे दुपदरी महामार्गात रु पांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने सिमेंट काँक्रि टीकरण करण्यात येत आहे.मात्र हे काम संथ गतीने सुरू असल्याने व रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. धुळीचा आरोग्यावर परिणाम होत आहे. संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन ठेकेदारास काम काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

अगोदरच अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यातच थंडीनेदेखील उपद्रव होत असतानाच, आता धुळीचा त्रास वाढल्याने पिकांसह शेतकऱ्यांनाही धुळीचा त्रास होत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम कधी मार्गी लागेल याची प्रतीक्षा असल्याची प्रतिक्रिया उद्धवराजे शिंदे, माणिक शिंदे, स्नेहा गायकवाड व आंदोलकांनी यावेळी दिली.श्वसनाची क्षमता होतेय कमीरस्त्याच्या कामामुळे उडणारी धूळ श्वासातून शरीरात जाते. त्यानंतर धूलिकण श्वसनसंस्थेत जमा होतात. हे धूलिकण श्वसनातून शरीरात, फुप्फुसात, श्वसननलिकेत जातात. अ‍ॅलर्जीचा त्रास असणाºयांना सर्दी, खोकला, कफ होणे, धाप लागणे असे त्रास होतात, तर काहींना सर्दी, खोकला आणि घसा दुखीचे आजार जडले आहेत, तर अनेकांची श्वसन क्षमता कमी होत असल्याने रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लावण्याचीअपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Strikeसंप