शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावला धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 16:27 IST

नांदगाव : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करून त्याची तत्काळ अंमलबजावणी व्हावी या व इतर मागण्यांसाठी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने येथील हुतात्मा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देया रास्ता रोकोमुळे औरंगाबाद, मालेगाव, चाळीसगाव, येवला या भागाकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. तासाहून अधिक काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

नांदगाव : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करून त्याची तत्काळ अंमलबजावणी व्हावी या व इतर मागण्यांसाठी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने येथील हुतात्मा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोकोमुळे औरंगाबाद, मालेगाव, चाळीसगाव, येवला या भागाकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. तासाहून अधिक काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्याच्या विविध भागांतून एकत्र आलेल्या धनगर समाजबांधवांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचे आहे, कोण म्हणतंय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशा घोषणा देत वाहतूक अडवली. समाजातील विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांचा सहभाग लक्षवेधी होता. साक्षी संजय देवकथे या युवतीने आंदोलकांसमोर परखड असे केले. राज्यघटनेनुसार धनगर समाजाचा समावेश हा अनुसूचित जमातीमध्येच आहे; परंतु धनगड व धनगर असा वाद निर्माण करून धनगर समाजाला जाणीवपूर्वक मागील सत्तर वर्षे आरक्षणापासून वंचित ठेवल्याची भावना साक्षीने भाषणातून व्यक्त केली. तिच्या भाषणाला जोरदार प्रतिसाद मिळाला. मनमाडचे माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, माजी उपनगराध्यक्ष शिवाजीराव पाटील, मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष सीताराम पिंगळे, सनी फसाटे, डॉ. गणेश चव्हाण, सुनील सोर, शरद आयनोर, बिरू शिंदे आदींची भाषणे झाली. धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या परमेश्वर घोंगडे यांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची आर्थिक मदत करावी, धनगर समाजातील विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तत्काळ अदा करावी, मेंढपाळांना गायरान जमिनी राखीव ठेवाव्यात, पावसाळ्यात वनजमिनीवर मेंढपाळांना चराई कुरणे राखीव ठेवावीत आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांना सादर करण्यात आले. या आंदोलनाला आम आदमी पार्टी, भारिप बहुजन महासंघ, हिंदू खाटिक समाज, संतूजी बिग्रेड, राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आदिंनी पाठिंबा दिला आहे.