शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको

By admin | Updated: December 7, 2015 23:12 IST

शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको

न्यायडोंगरी : नांदगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. ७) न्यायडोंगरी येथील सावरगाव चौफुली (नाना चौक), राज्य क्र मांक २४ वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने काहीकाळ संपूर्ण वाहतूक खोळंबून दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुधाला रास्त भाव मिळावा, गुरांचे खाद्य असलेल्या सरकी पेंडीचे साठेबाजी बंद करावी, कांद्याचे निर्यातशुल्क शून्य करण्यात यावे, एप्रिल महिन्यात झालेल्या गारपिटीची नुकसानभरपाई त्वरित मिळावी, माणिकपुंज धरणातील पाणी नदीपात्र व पाटाद्वारे सोडून शेतकऱ्यांना व पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशा विविध मागण्यांसाठी नांदगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नीलेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रास्ता रोको केले. सोमवार न्यायडोंगरी येथील आठवडे बाजाराचा दिवस असल्याने याप्रसंगी प्रचंड गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नांदगावचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्यासह प्रचंड फौजफाटा तैनात असल्याने आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी शासनाच्या वतीने नायब तहसीलदार वाघ व पोलीस निरीक्षक ठोंबे यांना लेखी निवेदन देण्यात आलेया आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते निवृत्ती खालकर, अशोक जाधव, तेजस बोरसे, दत्तात्रय जाधव, विलास घोटेकर, सुरेश जाधव, किरण लगडे, बालाजी निस्ताने, तुकाराम निस्ताने, दीपक शेलार आदि कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे एक तास चालू असलेल्या या आंदोलनामुळे खोळंबलेली वाहतूक पोलिसांच्या मदतीने सुरळीत करण्यात आल्यानंतर प्रवाशांनी व वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (वार्ताहर)

मनमाड :  कांद्याला सरासरी ११५0 रुपये भावमनमाड : कांदाभावात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आठशे ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली. बाजार समितीमध्ये  कांद्याला किमान ७00 व  कमाल १५00 रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी ११५0 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. या वर्षी पावसाने  दगा दिल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या उत्पादनावर झाला आहे. एकरी उत्पादन घटल्याने बाजारभाव वाढल्यानंतरही शेतकर्‍याचे आर्थिक नियोजन कोलमडले होते. सध्या झालेल्या बाजारभावातील घसरणीमुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. कांद्याबरोबरच भाजीपाल्याच्या उत्पादनातही घट झाली आहे. ज्या शेतकर्‍यांकडे थोड्याफार प्रमाणात पाणी आहे त्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.