शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
3
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
4
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
5
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
6
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
7
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
8
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
9
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
10
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
11
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
12
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
13
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
14
जातगणना : मॅजिक की मंडल?
15
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
16
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
17
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
18
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
19
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
20
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

बढत्यांमधील आरक्षण प्रमाणित करण्याची कार्यवाही थांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:12 IST

नाशिक महापालिकेच्या अधिनस्त विविध संवर्गांतील पदोन्नतीची बिंदूनामावली तपासणे व आरक्षण प्रमाणित करण्याची कार्यवाही शासनाचा पुढील आदेश होईपर्यंत तूर्त थांबविण्याचा निर्णय विभागीय आयुक्त कार्यालयाने घेतला आहे. ‘लोकमत’मध्ये ‘आरक्षणाने बढत्या बंद’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयाने सदर कार्यवाही थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेतील पदोन्नतीची प्रक्रिया काहीकाळ रखडणार आहे.

नाशिक : नाशिक महापालिकेच्या अधिनस्त विविध संवर्गांतील पदोन्नतीची बिंदूनामावली तपासणे व आरक्षण प्रमाणित करण्याची कार्यवाही शासनाचा पुढील आदेश होईपर्यंत तूर्त थांबविण्याचा निर्णय विभागीय आयुक्त कार्यालयाने घेतला आहे. ‘लोकमत’मध्ये ‘आरक्षणाने बढत्या बंद’ या   थळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयाने सदर कार्यवाही थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेतील पदोन्नतीची प्रक्रिया काहीकाळ रखडणार आहे.  नाशिक महापालिकेने गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गातील विविध पदांची पदोन्नतीविषयक बिंदू नामावली नोंदवही तपासण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात दि. २८ सप्टेंबर २०१७ रोजी सादर केली होती. शासन निर्णयानुसार, गट ‘ब’ आणि गट ‘क’(कनिष्ठ श्रेणी) या संवर्गातील पदोन्नतीच्या बिंदूनामावली तपासणीसाठी व आरक्षण निश्चिती करिता विभागीय स्तरावर विभागीय आयुक्तांना अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.  दरम्यान, शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिका डायरीवर सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून शासनाच्या तरतुदीनुसार पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊन पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यास हरकत नसल्याचे कळविले होते. तथापि, ‘लोकमत’च्या दि. १ नोव्हेंबर २०१७च्या अंकात ‘आरक्षणाने बढत्या बंद’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले. त्यात बढत्यांमधील आरक्षण रद्द करण्याच्या मुंबई न्यायालयाचे आदेशात स्थगिती देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केल्याने बढत्यांमधील आरक्षण बंद करण्याची भूमिका राज्य शासनाने घेतल्याचे व त्यासंबंधीचा आदेश येत्या बुधवारी काढला जाणार असल्याचे नमूद करण्यात आले होते.  ‘लोकमत’च्या याच वृत्ताच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयाने नाशिक महापालिकेच्या अधिनस्त विविध संवर्गांतील पदोन्नतीची बिंदूनामावली तपासणे व आरक्षण प्रमाणित करण्याची कार्यवाही पुढील आदेश होईपर्यंत तूर्त थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने पदोन्नतीविषयक बिंदूनामावली नोंदवही तपासणी व आरक्षण प्रमाणित करण्याची कार्यवाही तूर्त थांबविण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून रखडलेली पदोन्नतीची प्रक्रिया आणखी काहीकाळ रखडणार आहे. गेल्या काही वर्षांपासून पदोन्नती समितीची बैठकच झालेली नाही.