शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By admin | Updated: January 26, 2017 01:00 IST

शेतमालाला भाव : तांगा शर्यतीवरील बंदी उठविण्याची मागणी

दिंडोरी : येथील पालखेड चौफुली येथे सकाळी शिवसेनेच्या वतीने तांगा शर्यतीवर असलेली बंदी उठवावी व शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  शेतकऱ्याच्या पिकाला कवडीमोल भाव असून, शेतकरीवर्ग अनेक समस्यांअभावी संकटात सापडला आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेता शेतकऱ्याच्या समस्या तत्काळ मान्य कराव्यात, असे प्रतिपादन दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी दिंडोरी येथील पालखेड चौफुली येथे शेतकऱ्यांच्या मागणीबाबत रास्ता रोकोप्रसंगी केले.  यावेळी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, सुनील पाटील, फळबाग संघाचे अध्यक्ष वसंत कावळे, माजी तालुकाप्रमुख सतीश देशमुख, उत्तम जाधव, जि.प. गटनेते प्रवीण जाधव, उपतालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, नाना मोरे, शहरप्रमुख रमेश बोरस्ते, सुनील जाधव आदिंच्या नेतृत्वाखाली  रास्ता रोको करत तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी बांधवाना सावरण्यासाठी शिवसेना पक्ष भक्कम असून, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे सुरेश डोखळे, प्रवीण जाधव, वसंत कावळे यानी शेतकऱ्यांबाबत आपले मनोगत व्यक्त केले.  यावेळी शिवसेना कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. एक तास सुरू असलेल्या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.  पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)