शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डीप्रकरणी कॉँग्रेसचा रास्ता रोको

By admin | Updated: July 23, 2016 23:47 IST

आंदोलन : द्वारका परिसरात वाहतूक विस्कळीत

नाशिक : कोपर्डी बलात्कार प्रकरण, वाढती महागाई, वीज दरवाढ या विरोधात नाशिक शहर कॉँग्रेस व अल्पसंख्याक सेलच्या वतीने मुंबई-आग्रा महामार्गावर द्वारका चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही वेळ द्वारका परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती.द्वारका सर्कलवर शहराध्यक्ष शरद अहेर तसेच युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक राहुल दिवे, अल्पसंख्याक विभागाचे हनीफ बशीर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या वाढलेल्या घटनांमुळे महिलांनी जोरदार घोषणाबाजी झाली. या आंदोलनात कॉँग्रेसच्या वतीने केंद्र व राज्य सरकार विरोधात काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली. तसेच रास्ता रोको करून राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. मात्र पोलिसांनी रास्ता रोको करणाऱ्यांना अटकाव करून तत्काळ रास्ता रोको थांबविला. यावेळी कॉँग्रेसने तयार केलेल्या दहशतवादाच्या पुतळ्याला उड्डाणपुलाला लटकवून फास देण्यात आला. या पुतळा लावण्यावरूनही कार्यकर्ते व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. शहराध्यक्ष शरद अहेर यांनी केंद्र व राज्य सरकारवर टिका केली. आंदोलनात धीरज ननवाणी, महिला अध्यक्ष वत्सला खैरे, रईस शेख, गुलाम शेख, सुरेश मारू, भारत टाकेकर, जावेद इब्राहिम, ज्ञानेश्वर काळे, जावेद पठाण, स्वप्नील पाटील, फारूख शेख, इसाक कुरेशी आदिंसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)